Pune : पुण्यातील 13 महिन्याच्या बाळाला दुर्मिळ आजार, हवंय 16 कोटींचं इंजेक्शन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील एका १३ महिन्याच्या बाळाला स्पायनल मस्कुलर एट्रॉफी टाईप असा हा एक आजार झाला असून, या उपचारासाठी तब्बल अमेरिकेतून १६ कोटी रुपयांचे इंजेक्शनची गरज आहे. तर बाळाचे आईवडील अमित आणि रुपाली हे आपलं बाळ ठीक होण्यासाठी मदतीच्या दिशेने धडपड करत आहेत. तसेच त्यांनी पंतप्रधानांकडे मदतीचे हाक दिले आहे. त्या बाळावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून. १६ कोटी रुपये या सर्वसामान्य कुटुंबाला जमावानं हा प्रश्न पडला आहे.

या सामान्य कुटुंबातून बाळाला वाचवण्यासाठी आईवडिलांनी सर्वतोपरी निधीची हाक दिली आहे. तर बाळाची आई रूपाली रामटेककर यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे मदतीचे साकडं घातले आहे. पंतप्रधान नेहमीच मदतीसाठी पुढे येत असतात. आता माझ्या बाळालादेखील त्यांनी मदत करावी. माझं बाळ इतर मुलांप्रमाणे ठीक झालं पाहिजे. मोदीसाहेब माझ्या बाळाला वाचवा, असं त्यांनी म्हटलं. तर आज आमच्या बाळाला हा दुर्मिळ आजार झाला आहे. अशा दुर्मिळ आजारावरील हे महाग असणाऱ्या इंजेक्शनचे सरकारने संशोधन करण्याची आवश्यकता आहे असे बाळाचे वडील अमित रामटेककर यांनी म्हटले आहे. तसेच समाजात अनेक दानशूर लोक आहेत. त्यांनी पुढे यावं आणि मदतीचा हात पुढे करावा. त्याहीपेक्षा राजकीय नेते, सेलिब्रिटी, खेळाडू, उद्योगपती या सगळ्यांनी माझ्या बाळासाठी एक हात मदतीचा पुढे करावा असं त्यांनी कळकळून सांगितले आहे.

दरम्यान, बाळाचा जन्म झाल्यावर काही दिवसांनी त्याची मान धरत नव्हती. दुध पिण्यापासून ते अनेक त्रास त्याला होत होते. म्हणून आम्ही त्यावर दवाखान्यात काही तपासणी केल्या असता डॉक्टरांनी सांगितले, हळूहळू तो बरा होईल. पण त्याचा त्रास वाढतच होता. म्हणून पुढे जाऊन आणखी तपासण्या केल्यावर त्याला स्पायनल मस्कुलर एट्रॉफी हा एक दुर्मिळ आजार झाल्याचं समोर आलं. तर आता १६ कोटी एवढे रुपये लागत असल्याने निधी गोळा करण्यासाठी २५ दिवसात केवळ २३ लाख रुपये जमा झाले आहेत. तर लोकांनी आम्हाला सहकार्य करावं, आमच्या बाळाला वाचवा, आमच्या बाळाचा येणार दुसरा वाढदिवस आनंदाने साजरा व्हावा अशी एकच इच्छा कुटुंबातून व्यक्त होत आहे.