Pune : लिफ्टचा दरवाजा बंद करत जा असे सांगणार्‍या महिलेला दाम्पत्याकडून मारहाण, पुण्यातील सोमवार पेठेतील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – लिफ्टचा दरवाजा बंद करत जा, असे सांगणाऱ्या महिलेला दाम्पत्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवार पेठेतील कमला हाईट्समध्ये ही घटना घडली आहे.
याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी कमला हाईट्स अपार्टमेंटमध्ये राहतात. दोन दिवसांपूर्वी (दि. 9 एप्रिल) दुपारी आरोपींनी लिफ्टचा वापर केला. पण, नंतर दरवाजा उघडाच ठेवला. त्यामुळे फिर्यादी महिलेने लिफ्टचा दरवाजा बंद करत जा, असे सांगितले.

त्याचा राग आल्याने आरोपी महिलेच्या पतीने पार्किंगमध्ये तुटलेला फरशीचा जाड धारदार तुकडा उचलून फिर्यादीला मारण्याचा प्रयत्न केला. तसेच, फिर्यादीच्या डाव्या डोळ्याच्यावर कपाळावर बंद मुठीने जोरात बुक्की मारली. त्यांनतर फिर्यादी महिलेने खाली जमिनीवर ढकलून दिले. अधिक तपास समर्थ पोलीस करत आहेत.