Video : पुण्यातील व्यावसायिक जोशींची पत्नीसह कोल्हापूरात आत्महत्या, मुलाची प्रकृती चिंताजनक

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील लेबर कॉन्ट्रॅक्टर विनोद रमाकांत जोशी यांनी आपल्या पत्नी आणि मुलासह विष प्राशन करून आत्महत्या केली. मात्र, यामध्ये मुलगा बचावला असून त्याच्यावर कोल्हापूरातील सीपीआरमध्ये उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. हा प्रकार व्हीनस कॉर्नर कोंडाओळ मार्गावरील पल्लवी लॉजमध्ये शुक्रवारी मध्यरात्री उघडकीस आली. व्यावसायातील नुकसानिमुळे त्यांनी हे पाऊल उचलले असल्याची शक्यता त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

विनोद रमाकांत जोशी (वय ५९), मीना जोशी (वय-५०) असे मृत्यू झालेल्यांची नाव आहेत. तर मुलगा श्रेयस जोशी (वय-१७) याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरु आहेत. मृत्यूपूर्वी तिघांची सही असलेली चिठ्ठी पोलिसांना आढळून आली आहे. यामध्ये त्यांनी कोणाचाही दोष नसल्याचे लिहले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद जोशी हे पुण्यातील पिरंगुट, हडपसर, कोथरूड परिसरातील प्रसिद्ध लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांच्याकडे पुण्यातील सात कंपन्यांचे कंत्राट होते. मात्र, मागील वर्षापासून व्यवसायातील नुकसानीमुळे जोशी कुटंबीय आर्थिक अडचणीत सापडले होते. २३ जून रोजी रात्री देवदर्शन करण्यासाठी कोल्हापूरला जात असल्याचे नातेवाईकांना सांगून ते निघाले. २४ जून रोजी त्यांनी कोल्हापूरातील पल्लवी लॉजमध्ये खोली घेतली. तसेच आम्ही २८ तारखेपर्यंत राहणार असल्याचे हॉटेल चालकाला सांगितले.

बुधवारी रात्री विनोद आणि त्यांचा मुलगा श्रेयस हे रुमच्या बाहेर पडले. काहीवेळाने दोघे आले त्यावेळी त्यांच्या हातामध्ये पिशवी होती. रुममध्ये जाताना त्यांनी पाण्याच्या दोन बाटल्या घेतल्या. तसेच आम्हाला डिस्टर्ब करू नका असे सांगून ते खोलीत गेले. शुक्रवारी रात्री त्यांच्या खोलीतून उग्र वास येऊ लागल्याने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी शाहुपीरी पोलिसांना याबाबत कळवले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन रुमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी विनोद आणि त्यांची पत्नी मीना हे मृत अवस्थेत आढळून आले तर श्रेयस हा अत्यावस्थेत दिसून आला. तिघांनी किटकनाशक प्राशन करून सामुहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

आत्महत्येची माहिती नातेवाईकांना द्या

पोलिसांना त्यांच्याजवळ चिठ्ठी सापडली असून, यामध्ये त्यांनी व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आम्ही सामुहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या आत्महत्येची बातमी आपल्या नातेवाईकांना देण्यात यावी. तसेच याबाबत कोणालाही दोषी ठरवू नये. आमची ओळखपत्रे बॅगेतील काळ्या लखोट्यात ठेवण्यात आली आहेत असे लिहून त्यांनी धन्यवाद असा उल्लेख चिठ्ठित केला आहे.

कांबळे दुहेरी हत्याकांडातील तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा

अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना मिळणार पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण

‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

 ‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

 रक्तचाचणी द्वारे कळू शकते आयुर्मान आणि भविष्यातील आजार