Pune Court | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍यास 5 वर्षे सक्तमजुरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Court | सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळत असलेल्या ११ वर्षीय मुलीचा विनयभंग करणा-‍यास न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार (Special Judge K. K. jahagirdar) यांनी हा आदेश (Pune Court) दिला.

लखन पेरियार याला शिक्षा सुनावण्यात आली. २६ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास धानोरी परिसरात हा प्रकार घडला. याबाबत पिडीतेच्या आईने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद दिली आहे. सरकार पक्षातर्फे अरूंधती ब्रम्हे (Arundhati Brahma) यांनी कामकाज पाहिले. याप्रकरणात त्यांनी ५ साक्षीदार तपासले. गुन्ह्यात पिडीत मुलगी व तिच्या आईची साक्ष महत्त्वाची ठरली. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन निकम (API Sachin Nikam) यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून सतीश जाधव (Satish Jadhav) यांनी कामकाज पाहिले. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त 1 वर्षांचा कारावास भोगावा लागेल. तसेच, दंडाची रक्कम पिडीतेला देण्यात यावी, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. घटनेच्या दिवशी पिडीता सोसायटीच्या पार्किंगमध्ये मित्रांसमवेत खेळत होती. यावेळी, ती सोसायटीच्या वॉचमनच्या मुलीला खेळायला बोलावण्यासाठी तिच्या घरात गेली. यावेळी, त्याठिकाणी असलेल्या वॉचमनच्या नातेवाईकाने तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करत न्यायालयात हजर करत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

 

Web Title : Pune Court | 5 years hard labor for molesting a minor girl

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | विध्यार्थी हे देशाचा नविन इतिहास घडवणारी नविन पिढी – अनुराधा ओक

Antilia Case | NIA चार्जशीटमध्ये माजी कमिश्नर परमबीर सिंह यांचे नाव नाही, मात्र सायबर एक्सपर्टच्या जबाबातून प्रश्न उपस्थित

Gold Price Today | सोने-चांदीच्या किमतीत बदल, जाणून घ्या आज किती स्वस्त मिळतेय 10 ग्राम सोने?