Pune Court | अ‍ॅड. शाम गोपाल मुंदडा ‘त्या’ गुन्ह्यातून दोषमुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्ह्यात अ‍ॅड. शाम गोपाळ मुंदडा (Adv. Sham Gopal Mundada) यांना न्यायालयाने (Pune court) दोषमुक्त केले आहे. या प्रकरणी पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana police station) नोव्हेंबर 2015 मध्ये गुन्हा दाखल करुन न्यायालयात दोषारोपपत्र (Charge sheet) दाखल करण्यात आले होते. न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून सत्र न्यायाधीश टी.टी. आगलावे (Judge T.T. Aaglave) यांनी अ‍ॅड. शाम मुंदडा यांना गुन्ह्यातून (Pune Court) दोषमुक्त केले अशी माहिती अ‍ॅड. सुचित मुंदडा (Adv. Suchit Mundada) यांनी दिली.

अ‍ॅड. शाम मुंदडा यांच्या विरोधात सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे निरीक्षक बी.टी. पाचरणे (B.T. Pacharne) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पुण्यातील रविवार पेठेथील माहेश्वरी समाज श्रीराम मंदिरातील (Maheshwari Samaj Shriram Temple) अन्नकोट कार्यक्रमासाठी सह धर्मदाय आयुक्त यांनी बी.टी. पाचरणे यांची सुपरवायझर म्हणून नेमणूक केली होती. 9 नोव्हेंबर 2015 रोजी पाचरणे याच्या समक्ष माहेश्वर समाज श्रीराम मंदिराच्या ट्रस्टच्या नावाचा फलक काढण्यात आला होता.

यावरुन अ‍ॅड. शाम मुंदडा यांनी हरकत घेत पाचरणे हे चुकीचे कम करत असल्याचे म्हणत त्यांच्या अंगावर धावून गेले. तसेच धमकी दिली. याबाबत पाचरणे यांनी मुंदडा यांच्या विरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी शरद बिरदीचंद रासडा, न्यासाचे सचिव भगीरथ रामप्रताप राठी (Trust Secretary Bhagirath Rampratap Rathi) व मंदिरातील व्यक्तीचे जबाब नोंदवून सरकारी कामात अडथळा निर्माण केला व शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करुन कोर्टात (Pune Court) दोषारोप पत्र दाखल केले.

 

यावर पुण्यातील सत्र न्यायालयात (Sessions Court) सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान आरोपींचे वकील अ‍ॅड. सुचित मुंदडा यांनी युक्तीवाद करताना शाम मुंदडा यांनी सरकारी कामात कोणताही अडथळा निर्माण केला नसल्याचे सांगत त्यांनी कोणताही गुन्हा केला नसल्याने त्यांच्या विरुद्ध केस होत नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. तसेच दोषारोप ठेवण्यात येण्यासाठी लागणारा पुरावा दोषारोप पत्रात दिसून येत नाही. केवळ हरकत घेणे व मुद्दे मांडणे किंवा मोठ्या आवाजात बोलणे हा गुन्हा होत नसल्याचे न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून अ‍ॅड. शाम गोपाल मुंदडा यांना दोषमुक्त केले.

 

Web Title : Pune Court | Adv. Sham Gopal Mundada acquitted of that crime

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | ‘राज्यपालांच्या लेटरमुळं मी विधानपरिषदेवर आमदार झालो’ ! खोट्या स्वाक्षरीचं पत्र केलं व्हायरल, पुढं झालं असं काही…

Weight Loss Tips | अशाप्रकारे सेवन केले ओटमील, तर कमी होण्याऐवजी वाढू लागेल वजन!

Chipi Airport Inauguration | एकमेकांकडे पाहिलं नाही, ना नमस्कार केला; CM ठाकरे-राणेंमधील ‘टशन’ चिपी विमानतळावर पहायला मिळालं (व्हिडीओ)