Pune Court | कुरकुंभ MIDC परिसरामध्ये अमली पदार्थाची निमिर्ती केल्याप्रकरणी दोघांचा जामीन अर्ज दुसर्‍यांदा फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Court | कुरकुंभ औद्योगिक (kurkumbh midc) परिसरामध्ये एका लॅबोरेटरीमध्ये अवैधरीत्या मेटफिटॅमिन हा अमली पदार्थ तयार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांचा जामीन अर्ज न्यायालयाने (Pune Court) दुस-यांदा फेटाळला.

विशेष न्यायाधीश राजेंद्र व्ही. लोखंडे (Special Judge Rajendra V. Lokhande) यांनी हा आदेश दिला. सुरेश देशमुख (Suresh Deshmukh) व संजय चांदगुडे (Sanjay Chandgude)
असे जामीन फेटाळण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
२०१६ मध्ये कुरकुंभ औद्योगिक परिसरामध्ये ((kurkumbh midc Pune) समर्थ लॅबोरेटरी (Samarth Laboratory) या कारखान्यात अवैधरीत्या मेटफिटॅमिन हे अमली पदार्थ
तयार होत असल्याची माहिती कस्टम्स नार्कोटिकस सेल विभागास मिळाली.
त्या माहितीच्या आधारे नार्कोटिकस सेल अधिका-यांनी छापा मारून बिपिन कुमार, सुरेश देशमुख, किशोर सुर्वे, संजय चांदगुडे व संदीप धुणे या पाच आरोपींना अटक केली होती.

 

या छाप्यामध्ये एकूण १६० किलो वाणिज्यक प्रमाणाचे मेटफिटॅमिन नार्कोटिकस सेल विभागाने जप्त केले होते.
त्यानंतर सुरेश देशमुख व संजय चांदगुडे यांनी जामिन मिळण्यासाठी दुस-यांदा अर्ज दाखल केला होता.
नार्कोटिकस सेल कस्टम्स खात्याच्या वतीने विशेष सरकारी वकील ॲड. संदीप घाटे (Public Prosecutor Adv. Sandeep Ghate)
यांनी आरोपींना जामीन देण्यास विरोध केला.
आरोपी सुरेश देशमुख व संजय चांदगुडे याचे वकिलांनी सदर गुन्हा आरोपीने केला नाही.
आरोपींचा या गुन्ह्याशी संबंध नाही व दोन्ही आरोपी पाच वर्षापेक्षा जास्त कालावधीकरिता तुरुंगात असल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला.
ॲड. घाटे यांनी या युक्तिवादावर हरकत घेऊन प्रचलित सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाड्याचे दाखले दिले व दोषारोपपत्र दाखल असले तरी
अमली पदार्थ सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपीस जामिनावर मुक्त करता येत नाही, असा युक्तिवाद केला.
या गुन्ह्यामध्ये नार्कोटिकस सेल कस्टम्स खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक मदन देशमुख (SP Madan Deshmukh)
व कस्टम्स वरिष्ठ निरीक्षक अमजद शेख (custom inspector Amjad Shaikh) यांनी काम पाहिले.

 

Web Title : Pune Court | Bail plea rejected for second time in Kurkumbh MIDC premises

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune police | पोलिसांच्या स्पर्धेला रिक्षावाल्यांचे प्रत्युत्तर, पोलिसांसाठी आयोजित केली 1 कोटी बक्षिसांची स्पर्धा

Pune police | पोलिसांच्या स्पर्धेला रिक्षावाल्यांचे प्रत्युत्तर, पोलिसांसाठी आयोजित केली 1 कोटी बक्षिसांची स्पर्धा

Mayor Murlidhar Mohol | महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या आईनंही अनुभवलं सेल्फीचं जग; महापौरांची भावनिक प्रतिक्रिया, सेल्फी ‘Viral’