Pune Court | फरार कालावधीत रविंद्र बऱ्हाटेला घरात ‘थारा’ देणाऱ्या वकिलाच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय, जाणून घ्या

पुणे : Pune Court | मोक्कानुसार (MCOCA) कारवाई झालेला आणि फसवणूक, जीवे मारण्याची धमकी यासह विविध कलमांनुसार गुन्ह्या दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटे (Ravindra Barate) याला घरात आश्रय दिल्याप्रकरणी वकिलाला मोक्का न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर (Special Judge S. R. Navander) यांनी हा आदेश (Pune Court) दिला.

ॲड. सागर संजय म्हस्के Adv. Sagar Sanjay Mhaske (वय 32, रा.म्हस्के वस्ती, आळंदी रस्ता) असे जामीन झालेल्या वकिलाचे नाव आहे. हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) त्याला अटक केली होती.
त्याने अ‍ॅड.. तुषार चव्हाण (Adv. Tushar Chavan) यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. त्यांना ॲड. विपिन मिश्रा (Adv. Vipin Mishra ) आणि ॲड. शंकर कदम (Adv. Shankar Kadam) यांनी सहाय केले. ॲड. म्हस्के याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले आहे.
तपासासाठी त्याच्या ताब्याची गरज नाही. त्याला मोक्का लागू होत नसल्याचा युक्तीवाद अ‍ॅड. तुषार चव्हाण यांनी केला. त्यानुसार न्यालालयने हा निकाल दिला आहे.
या गुन्ह्यात बऱ्हाटे, त्याची पत्नी, मुलासह 21 जणांवर हडपसर पोलिसात गुन्हा दाखल आहे.
बऱ्हाटेवर मोक्कासह एक डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत.
तो फरार असताना आळंदी रस्त्यावरील म्हस्के वस्ती येथे ॲड. सागर म्हस्के याच्या घरात राहात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
त्यानुसार पोलिसांनी ॲड. सागर याला अटक केली आहे. त्याच्यावरही मोक्का, ॲट्रॉसिटीसह भादवीचा विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील वाचा

Pune Corona | पुणे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट राज्यात सर्वाधिक

Crime News | पतीच्या निधनानंतर वृद्ध पत्नीनेही केली 7 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Court | Court decides on bail application of lawyer who gave ‘Thara’ to Ravindra Barhate at home during absconding period, find out

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update