Pune Court | अल्पवयीन मुलीला लग्नाची मागणी घालणे म्हणजे लैंगिक छळ नाही; न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निष्कर्ष

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Court | पुण्याच्या न्यायालयात बाललैंगिक अत्याचार खटल्याची सुनावणी झाली. विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार (Special Judge K. K. Jahagirdar) यांनी लैंगिक हेतूशिवाय अल्पवयीन मुलीकडे प्रेम व्यक्त करणे, त्याचबरोबर तिला लग्नाची मागणी घालणे म्हणजे लैंगिक छळ म्हणता येणार नाही, असा निष्कर्ष काढत बाललैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातून आरोपीची निर्दोष (Pune Court) मुक्तता केली.

 

या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, २०१९ मध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या वाढदिनादिवशी आरोपीने तिला त्याच्या कारमध्ये घेऊन जाऊन प्रेम व्यक्त केले होते. तसेच लग्नाची मागणी घातली होती. त्यापूर्वी ही त्याने लग्न करण्याची मागणी केली होती. त्यावरून मुलीच्या आईने भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात (Bhosari MIDC Police Station) फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम IPC 363 (पळवून नेणे) आणि IPC 354 (ड) विनयभंग (molestation case), बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO Act) कलम ११ आणि १२ नुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला होता. सुनावणीदरम्यान, अ‍ॅड. श्रीधर एस. हुद्दार (Adv. Sridhar S. Huddar) यांनी युक्तिवाद करताना कोणत्याही लैंगिक हेतूशिवाय आरोपीने कृत्य केले आहे.त्यामुळे हि घटना लैंगिक अत्याचाराच्या श्रेणीत येत नाही, असे सांगितले. तसेच यावेळी उच्च (High Court) आणि सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) न्यायनिवाड्याचे दाखले त्यांनी दिले.

 

फिर्यादीत मुलीचे अपहरण केले असल्याचे म्हंटले आहे. मात्र पुराव्यांवरून आरोपीच्या गाडीत बसण्यास मुलीने विरोध केला नसल्याचे स्पष्ट होत आहे.
तसेच, या प्रकरणात महत्त्वाचे साक्षीदार तपासलेले नाहीत. त्यामुळे अपहरण आणि विनयभंग आरोपीने केल्याचे सिद्ध होत नाही.
लैंगिक हेतूशिवाय आरोपीने प्रेम व्यक्त केले असेल तसेच लग्नाची मागणी केली असेल तर तो लैंगिक अत्याचार होत नाही, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

 

Web Title :- Pune Court | demanding marriage no sexual harassment pune shivajinagar court Special Judge K. K. Jahagirdar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | घरफोडी व वाहनचोरी करणारा सराईत गुन्हेगार विमानतळ पोलिसांकडून गजाआड, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

Omicron Covid Variant | अखेर भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव ! कर्नाटकमध्ये 2 रुग्ण सापडले; महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं

Omicron Covid Variant | 1 नोव्हेंबरनंतर पुण्यात प्रवाशांची तपासणी करण्याचे महापालिकेला आदेश

Priyanka Nick Anniversary | निक जोनस आणि प्रियंका चोपराने सेलिब्रेट केली त्यांची तिसरी Anniversary, रोमँटीक व्हिडीओ आला समोर