Pune Court | फसवणूक प्रकरण ! मराठे ज्वेलर्सच्या प्रणव मराठेंचा जामीन फेटाळला; कुटुंबियांनी कॉसमॉस बँकेचे साठ कोटींचे कर्ज थकवले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  Pune Court | मराठे ज्वलर्सच्या विविध योजनांमध्ये गुंतविलेल्या रोख रक्कम, सोने चांदीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतविलेल्या ठेवीची रक्कम तसेच त्यावरील परतावा न देता गुंतवणूकदरांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रणव मराठे (pranav marathe jewellers) यांचा जामीन अर्ज न्यायालयाने (Pune Court) फेटाळला आहे.

या गुन्ह्यात पोलिसानी प्रणव मिलिंद मराठे Pranav Milind Marathe (वय २६, रा. रूपाली अपार्टमेंट, एरंडवणे), कौस्तुभ अरविंद मराठे Kaustubh Arvind Marathe (वय ५४) आणि मंजिरी कौस्तुभ मराठे Manjiri Kaustubh Marathe (वय ४८, दोघे रा. कर्वेनगर) यांना अटक केली आहे. तर मयत मिलिंद उर्फ बळवंत अरविंद मराठे (milind arvind marathe), नीना मिलिंद मराठे (neena milind marathe) यांच्यासह इतरांविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात (Kothrud Police Station) गुन्हा दाखल आहे. त्यांच्याविरोधात शुभांगी विष्णू कुटे (वय ५९, रा. शिवतीर्थ नगर, पौड रोड, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. प्रणव मराठे ज्वेलर्सची लक्ष्मी रोड (c) तसेच पौड रोड कोथरूड (Paud Road, Kothrud) येथील शाखांमध्ये १४ जानेवारी २०१७ ते जानेवारी २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.

आरोपींनी प्रणव ज्वेलर्सच्या विविध योजनांमध्ये रोख रक्कम, सोने,चांदी आदी गुंतवणूक करायला लावली तसेच फिर्यादींसह एकुण १८ गुंतवणूकदारांची पाच कोटी नऊ लाख ७२ हजार ९७० रूपयांची फसवणूक केली असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात निदर्शनास आले आहे.
आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक एस. यु. गायकवाड (API S.U. Gaikwad) या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

 

कॉसमॉस बँकेचे ६० कोटींचे कर्ज थकवले :

या गुन्ह्यात मराठे ज्वलर्स-प्रवण मराठे ज्वलर्स प्रा. लि. यांनी कॉसमॉस बँकेकडून (cosmos bank) स्टॉकच्या किमतीवर ६० कोटी रुपयांचे कर्ज घेवून त्याची परतफेड न केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली आहे. आरोपींनी या बँकेकडून कर्ज घेवून त्याची वेळेत परतफेड केलेली नाही. त्यामुळे बँकेचे त्यांना वसुलीची नोटीस पाठवली आहे.
प्रवण मराठे हे मराठे ज्वलर्स-प्रवण मराठे ज्वलर्स प्रा. लि. या दोन्ही भागीदारी संस्थाचे प्रत्येकी २० टक्के भागीदार आहेत.
अशी माहिती सरकारी वकील मारुती वाडेकर (Government Advocate Maruti Wadekar) यांनी न्यायालयास (Pune Court) दिली.

 

Web Title : Pune Court | Fraud case! Prominent Marathas of Maratha Jewelers denied bail; The family owed Rs 60 crore to Cosmos Bank

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | जबरदस्तीने धर्मांतरास ‘मुस्लीम राष्ट्रीय मंच’चा विरोध

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचं पुढचं टार्गेट जरंडेश्वर कारखाना; दिलं ‘या’ दिग्गजांना आव्हान

Gold Price Today | चांदीत मोठी घसरण, सोन्याचे दर पुन्हा उतरले; जाणून घ्या नवीन दर