Pune Court | बालेवाडी येथील जागा हडपण्यासाठी बनावट खरेदीखत तयार करून सेवानिवृत्त अधिकार्‍याची फसवणूक; उत्तुंग पाटीलला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Court | बालेवाडी येथील जागा हडपण्यासाठी तोतया वेक्ती उभी करून बनावट खरेदीखत तयार करीत एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला चतु:श्रृंगी पोलिसांनी (chaturshringi police) अटक केली आहे. उत्तृंग कृष्णराव पाटील Uttung Krishnarao Patil ( वय 34 रा.फ्लँट नं 11 दीपलक्ष्मी हौसिंग सोसायटी चिंचवड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. एका 85 वर्षीय सेवानिवृत्त अधिकाऱ्याने याबाबत फिर्याद (Pune Court) दिली आहे.

हा प्रकार 15 ते 18 ऑक्टोबर 2020 दरम्यान बालेवाडी येथील जागेवर आणि दुय्यम निबंधक कार्यालय हवेली 17 येथे घडला. हिरकणी बिल्डकॉनतर्फे उत्तुंग कृष्णराव पाटील यांनी तीन अज्ञात व्यक्तींशी संगनमत करून फिर्यादी, त्यांचा मुलगा व मुलगी यांच्या ऐवजी तोतया माणसे उभी करून व त्यांच्या नावाने त्यांचे खोटे फोटो, पँनकार्ड व खोटे आधारकार्ड लावत त्यांच्या नावाने खोट्या सह्या व अंगठे वापरून जागा हडपण्याच्या दृष्टीने बनावट खरेदीखत तयार केले. या बनावट खरेदीखताचा वेळोवेळी वापर करून फिर्यादीची फसवणूक केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपीस गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

आरोपीने बनावट खरेदीखतामध्ये दीड कोटी रूपयांचे तीन डीडीडी हे एका बँकेच्या दोन शाखांमध्ये सादर केले आहेत. या रकमेसंदर्भात तसेच बँक खाते व डीडीडी संदर्भात आरोपीकडे तपास करायचा आहे. आरोपीने खोटी पँनकार्ड, आधारकार्ड कोठे आणि कोणाच्या मदतीने तयार केले आहेत, त्याबाबत तपास करून पुरावा हस्तगत करायचा आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील अ‍ॅड. विशाल मुरळीकर (Government Advocate Adv. Vishal Muralikar) यांनी करीत आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने आरोपीला 19 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Web Titel :- Pune Court | Fraud of retired officer by making fake purchase deed to grab land at Balewadi; Uttung Patil arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Surekha Punekar | राष्ट्रवादी पक्षात प्रवेश का? लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर म्हणाल्या…

Surekha Punekar | लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Pune NCP | नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नव्या जबाबदारीचे नियुक्तीपत्र प्रदान; शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले – ‘पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकणारच’