नगरसेवक रवींद्र धंगेकर यांना जामीन मंजूर 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ केल्याप्रकरणी  काँग्रेसचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सत्र न्यायाधीश ए.वाय. थत्ते यांनी हा आदेश दिला आहे.

यापूर्वी अरविंद शिंदे यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.

पाषाण आणि कात्रज येथील तलावांमध्ये जलपर्णी नसतानाही 23 कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्याची टीका करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनात आंदोलन केले होते. त्यावेळी निंबाळकर यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. याप्रकरणी निंबाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अरविंद शिंदे व रविंद्र धंगेकर यांच्यासह १५ ते १ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अरविंद शिंदे यांना अटकपुर्व जामीन मिळाला होता. तर धंगेकर यांना अटक केली होती, सुरुवातीला पोलीस कोठडी, त्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती, त्यानंतर त्यांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला.