Pune Court | मुलीने नष्ट केले नानासाहेब गायकवाडच्या सावकारी व बेहिशोबी मालमत्तेचे पुरावे; पत्नी आणि मुलानेही केली मदत, जाणून घ्या आज कोर्टात काय झालं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  Pune Court | नानासाहेब गायकवाड (nanasaheb gaikwad) याच्या सावकारी व बेहिशोबी मालमत्तेचे पुरावे त्यांच्या मुलीने भाऊ आणि आईच्या मदतीने नष्ट केले आहे. तसेच काही कागदपत्रे अनोळखी ठिकाणी लपवून ठेवल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात (Pune Court) स्पष्ट झाले आहे.

या गुन्ह्यातील कादगदपत्री पुरावा आणि तांत्रिक पुरावा आरोपींनी निष्पन्न साथीदारांचे मदतीने
लपवून ठेवला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपी दांगट यांने या गुन्ह्यातील बेहिशोबी मालमत्तेबाबत (Disproportionate assets) माहिती दिली आहे. कागदपत्रांची बॅग लपवून ठेवलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे.
या प्रकरणात अटकेत असलेले नानासाहेब ऊर्फ भाऊ शंकरराव गायकवाड Nanasaheb alias Bhau Shankarrao Gaikwad (वय ७०), नंदा नानासाहेब गायकवाड Nanda Nanasaheb Gaikwad (वय ६५) आणि गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड Ganesh alias Kedar Nanasaheb Gaikwad (सर्व रा.एनएसजी हाऊस, औंध) यांना पोलिस कोठडीत आठ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. विशेष मोक्का न्यायाधीश एस. आर. नावंदर Special Mocca Judge S. R. Navander यांनी हा आदेश दिला.

पोलिसांनी यापुर्वी केलेल्या गायकवाडच्या घरझटतीमधून ईएसए मॉडेल २०० एअर रायफल, ३१ जिवंत काडतुसे असलेले ३२ कॅलीबरचे दोन बॉक्स, नोटा मोजण्याचे दोन मशिन आणि नानासाहेब गायकवाड,
संजीव मोरे (Sanjeev More) व इतर ७० लोकांकडून घेतलेले विना सह्यांचे खरेदीखत औंध येथील गायकवाड कुटुंबीयांच्या घरात मिळून आले आहे.
तसेच पोलिसांना दोन पानी कागद मिळाला असून त्यावर १४ लोकांची नावे आहेत.
नावांच्या पुढे त्यांना कर्जाने दिलेली रक्कम लिहिण्यात आली आहे.
गायकवाड त्यांच्या घरातील सीसीटीव्हीचे संच बंद असून उपलब्ध असलेल्या डीव्हीआर (DVR) तसेच तेथील इतर ईलेक्ट्रानिक साधनांमध्ये (Electronic device) छेडछाड केल्याचे दिसून आले आहे.

 

तसेच अनेक कागदपत्रे फाईल्समधून काढून घेण्यात आले आहे. नानासाहेब गायकवाड यांच्या बेडरुमध्ये पैसे मोजण्याची एक मशिन मिळून आली आहे.
नंदा गायकवाड हीने साथीदारांच्या मदतीने गुन्ह्याच्या संदर्भातील महत्त्वाचे कागदपत्र व पुरावे इतर ठिकाणी हलविले आहेत.
वडगाव बुद्रूक येथील फ्लॅटमध्ये मिळालेल्या डाय-यांमधील पाने नंदा यांनी फाडल्याचेही सिद्ध झाले आहे.
मुळ फिर्यादीतर्फे ॲड. पुष्कर दुर्गे (Adv. Pushkar Durge), ॲड. सचिन झालटे (Adv. Sachin Zalte), ॲड. ऋषिकेश धुमाळ (Adv. Rishikesh Dhumal) यांनी कामकाज पाहिले.
सहायक पोलिस आयुक्त बजरंग देसाई (Assistant Commissioner of Police Bajrang Desai) हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Court | nanasaheb gaikwad case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

EPFO | पीएफ खातेधारकांसाठी खुशखबर ! अप्लाय केल्यानंतर फक्त ‘इतक्या’ दिवसात मिळतेय रक्कम, जाणून घ्या

Pune Crime | पिस्तुलाच्या धाकाने लुटल्याप्रकरणात महिलेचा जामीन फेटाळला, शेतातून भोपळे चोरल्याची तक्रार केल्यास अ‍ॅट्रॉसिटी लावण्यासह…

Supreme Court | ‘सुप्रीम कोर्टा’ने केंद्राला सुनावले; म्हणाले – ‘कोरोना मृतांच्या वारसांना मदत कधी देणार?’