Pune Court | नानासाहेब गायकवाडांच्या मुलीचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जीव मारण्याची धमकी देत मर्सिडीज कार नावावर केल्याचं प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Court | प्रतिमहा चार टक्के व्याजाने दिलेले २९ लाख रुपये परत न केल्याने जीवे मारण्याची धमकी, मर्सिडीज बेंझ कार नावावर करून घेत २९ लाख रुपयांच्या बदल्यात ३७ लाख रुपये उकळल्याप्रकरणी औंध येथील नानासाहेब गायकवाड याची मुलगी दीपा गायकवाड हिचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने (Pune Court) फेटाळला.

या प्रकरणी नानासाहेब गायकवाड (Nanasaheb Gaikwad), दीपा गायकवाड (Deepa Gaikwad) यांच्यासह राजू दादा अंकुश (Raju Dada Ankush) आणि नानासाहेब गायकवाडच्या चालकावर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात (chaturshringi police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रमेश शिवाजी येवले (वय २७, रा. पिंपळे निलख) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २०१७ ते मार्च २०२१ दरम्यान आरोपीच्या औंध येथील घरी व सूस येथील फार्म हाऊसवर घडली.

नानासाहेब गायकवाडने फिर्यादी यांना व्यवसायासाठी २०१७ मध्ये दरमहा ४ टक्के व्याजाने २९ लाख रुपये दिले होते.
त्याबदल्यात फिर्यादी दरमहा १ लाख ३६ हजार रुपये व्याज नानासाहेब गायकवाडकडे देत होते.
मात्र व्याजाच्या मुद्दलाच्या सिक्युरिटीसाठी नानासाहेब गायकवाडने फिर्यादी यांची मर्सिडीज बेंझ कार ताब्यात घेतली.
त्यानंतर नानासाहेब गायकवाडने फिर्यादी यांना त्याच्या घरी बोलावून गाडीच्या कागदपत्रांसाठी आवश्यक
असणाऱ्या आरटीओच्या कोऱ्या टीटी अर्जावर व २५ लाख रुपयांच्या धनादेशावर स्वाक्षऱ्या करून घेतल्या आणि ती गाडी दीपा गायकवाडच्या नावावर करून घेतली.
त्यानंतर काही दिवसांनी नानासाहेब गायकवाडने फिर्यादी यांना जबरदस्तीने आपल्या फार्म हाऊसवर नेऊन
अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि कानाजवळ तीन गोळ्या झाडल्या, असे फिर्यादीत नमूद आहे.

 

अर्जदार गाडीच्या लाभार्थी :

या प्रकरणी दीपा गायकवाडने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी त्यास विरोध केला.
या गुन्ह्यात अर्जदार आरोपी लाभार्थी असून, फिर्यादी यांच्याकडून जबरदस्तीने काढून घेतलेली मर्सिडीज बेंझ कार आरोपीच्या नावावर असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
नानासाहेब गायकवाड याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरार झाले होते.
त्यांचे महत्त्वाचे कागदपत्र व रोख रक्कम अर्जदार आरोपी दीपा गायकवाडने इतर ठिकाणी लपवून ठेवल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे,
जामीन मंजूर झाल्यास आरोपी पुरावे नष्ट करण्याची शक्यता आहे,
असा युक्तिवाद ॲड. बोंबटकर (Adv. Bombatkar) यांनी केला.

Web Title : Pune Court | Nanasaheb Gaikwad’s daughter’s pre-arrest bail rejected; Case of threatening to kill in the name of Mercedes car

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update