Pune Court News | सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Court News | सातारा (Satara) जिल्ह्यातील कराडमधील (Karad) द यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील (The Yashwant Co Op Bank) करोडो रुपयांच्या अपहार प्रकरणी सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर (Shekhar Charegaonkar) यांच्यासह रोहित भीमराव लभडे (Rohit Bhimrao Labhde) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुण्यातील विशेष न्यायाधीश (MPID) के.पी. नांदेडकर (Judge KP Nandedkar) यांनी फेटाळला.

द यशवंत को ऑपरेटिव्ह बँकेचे (शाखा कराड) अध्यक्ष शेखर सुरेश चरेगावकर व द चिखली अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे Chikhli Urban Co-Operative Bank (चिखली. जि. बुलढाणा) अध्यक्ष सतीश भगवानदास गुप्ता (Satish Bhagwandas Gupta) व रोहित भीमराव लभडे यांच्यासह आणखी पाच जणांनी त्यांच्या इतर साथीदारांसोबत संगनमत करुन बँकेमार्फत राबविलेल्या गुंतवणुकीच्या स्कीमअंतर्गत आठ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करुन या कर्ज रकमेचा अपहार केल्याप्रकरणी फिर्यादी प्रदीप रामचंद्र चोरघे यांच्या तक्रारी अर्जाद्वारे पुण्याच्या सत्र न्यायाधीशांच्या लेखी आदेशानुसार भोर पोलीस ठाण्यात (Bhor Police Station) पाच मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.(Pune Court News)

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा विभाग, पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण यांच्याकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणी शेखर सुरेश चरेगावकर आणि रोहित भीमराव लभडे यांनी विशेष सत्र न्यायाधीश पुणे यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्याकरीता 14 मार्च रोजी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, या प्रकरणी अंतरिम अटकपूर्व जमीन नसताना देखील तपासी अधिकाऱ्यांनी आरोपींना अटक केली नाही.

फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला.
बँकांच्या आधारे भोळ्याभाबड्या कर्जदारांना आरोपींनी विविध गुंतवणुकीच्या योजनांच्या जाळ्यात अडकवून त्यांची आर्थिक फसवणूक करण्याची कार्यपद्धती निश्चित केली.
सातारा येथील सहकारी संस्थेचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक यांनी केलेल्या लेखापरीक्षणातून हा घोटाळा उघड झाला.
आरोपींनी पुणे व सातारा भागातील अनेक कर्जदारांना देखील फसवले असल्याचे फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले.
त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपींचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Baramati Lok Sabha | बारामतीत सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यास तुमचे राजकीय करिअर धोक्यात येईल का? अजित पवार म्हणाले…

Pune Lok Sabha | पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ गुरुवारी भरणार अर्ज ! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती, जंगी रॅली, भव्य सभा घेणार