खंडणी प्रकरण : आरोपींना 14 दिवसांची पोलिस कोठडी, 72 तासात न्यायालयात हजर राहण्याचा आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   बडतर्फ पोलिस शैलेश जगतापसह चौघांना 72 तासांत न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. तर न्यायालयाने त्यांना 14 दिवसांसाठी पोलिस कोठडी सुनावली. खंडणी व फसवणूक प्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपींना दिलेल्या जामिनावर पोलिस आणि सरकारी पक्षाने सत्र न्यायालयात अपील केले होते. त्या अपिलात अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.पी. पिंगळे यांनी हा आदेश निकाल दिला.

देण्याची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने जामिनाचा आदेश बरखास्त करीत 72 तासांत आरोपींनी न्यायालयात हजर व्हावे, असे आदेश बुधवारी दिली आहेत. फिर्यादी यांची फसवणूक झालेल्या 17 लाखांपैकी किती रक्कम या चार आरोपींना मिळाली, आरोपींनी औंधमधील एका प्लॉटचे खोटी कागदपत्रे कुठे बनवली, गुन्ह्यांचा कट कुठे रचला, त्यात कोणाचा काय सहभाग आहे, याचा तपास करण्यासाठी त्यांना पोलिस कोठडी देणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी केला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like