Pune : न्यायालयीन कामकाज अडीच तासांच्या एका शिफ्टमध्ये चालणार ! कामाची वेळ दिड तासांनी केली कमी, 50 टक्केच कर्मचारी उपस्थित राहणार

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाच्या न्यायालयीन कामकाजावर देखील झाला असून तेथील कामकाजाच्या वेळा आणखी कमी करण्यात आल्या आहेत. दोन शिफ्टमध्ये चार तास सुरू असलेले कामकाज आता एकाच शिफ्टमध्ये अडीच तासच चालणार आहे. याचा परिमाण खटल्यांच्या सुनावणी व पक्षकारांनावर होणार आहे.

जिल्ह्यातील न्यायालयीत कामकाजाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा नवीन नियमावली लागू केली आहे. त्यानुसार सोमवारपासून (ता.१९) येथील जिल्हा न्यायालयातील कामकाज सकाळी ११ ते दुपारी दिडे अशा एक शिफ्टमध्ये अडिच तास सुरू राहणार आहे. तसेच या काळात ५० टक्केच कर्मचारी उपस्थित असणार आहेत. मात्र सर्व न्यायाधीशांनी उपस्थित राहावे, असे उच्च न्यायालयाच्या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्या येथील न्यायालयातील कामकाज सकाळी ११ ते दुपारी १ आणि दुपारी १.३० ते ३.३० अशा दोन शिफ्टमध्ये सुरू होते. त्यात जोडून आलेल्या सुट्या व उच्च न्यायालयाने दिलेल्या अतिरीक्त सुट्यांमुळे सोमवार ते शनिवारपर्यंत (ता. १२ ते १८) कामकाज बंद आहे. सोमवारपासून न्यायालये सुरू झाल्यानंतर एकच शिफ्टमध्ये कामकाज चालणार असून जी प्रकरणे महत्त्वाची नाही त्यांना पुन्हा तारखांवर तारखा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकाळात केवळ महत्त्वाच्या खटल्यांवर सुनावणी होणार आहे. तसेच त्याच खटल्यातील पक्षकार, वकिलांना न्यायालयात प्रवेश देण्यात येणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत हे नियम लागू असणार आहेत.

प्रत्येक शनिवारी कामकाज बंद :

विकएन्ड लॉकडाऊनमुळे प्रत्येक शनिवारी न्यायालयास देखीस सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे शनिवारी कामकाज बंद राहणार आहे. ज्या दावे किंवा खटल्यांमध्ये युक्तिवाद पूर्ण झाला आहे. त्या प्रकरणांचे निकाल वा आदेश पारित केले जाणार आहेत.

असे होणार कामकाज :

– अडीच तासांच्या एका शिफ्टमध्ये सुनावणी
– ५० टक्के कर्मचारी राहणार उपस्थित
– सर्व न्यायाधीश उपस्थित राहणार
– रिमांड, जामीन व दिवाणी आणि फौजदारीमधील तात्काळ स्वरूपाच्या खटल्यांवर सुनावणी जातील.
– न्यायाधीश, वकील, पक्षकार, साक्षीदार किंवा आरोपी नसतील तर विरुद्ध आदेश पारित केले जाणार नाही
– न्यायालयाच्या आवारातील कॅन्टीन व बार रुम बंद राहतील
– सुरक्षा व आरोग्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात

विनाकारण गर्दी होऊ नये म्हणून तारीख व महत्त्वाचे काम असणा-या वकील-पक्षकारांना न्यायालयाच्या आवारामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. न्यायालयामध्ये होणारी गर्दी टाळावी. न्यायालयीन कामकाज नेमके कसे चालणार याबाबत येथील प्रमुख जिल्हा न्यायाधीशांचे आदेश येतील.

अ‍ॅड. सचिन हिंगणेकर, उपाध्यक्ष, पुणे बार असोसिएशन