Pune Court | शिवाजीराव भोसले सह. बँकेचं 496 कोटीचं अपहार प्रकरण ! आमदार अनिल भोसले, शैलेश भोसले, मंगलदास बांदल यांच्यासह ‘या’ 7 जणांविरूध्द कोर्टात 7380 पानी पुरवणी दोषारोप पत्र

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Court | शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील (shivajirao bhosale sahakari bank) 496 कोटी 44 लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी बँकेचे अध्यक्ष आमदार अनिल भोसले (MLA Anil Bhosale) यांच्यासह सात आरोपींविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने (economic offences wing) आज विशेष न्यायालयात 7 हजार 380 पानांचे पुरवणी आरोपपत्र (Supplementary Chargesheet) दाखल (Pune Court) केले.

सुर्याजी जाधव, तानाजी पडवळ, शैलेश भोसले, मंगलदास बांदल, हितेंद्र पटेल, मनोजकुमार अब्रोल अशी अन्य आरोपींची नावे आहेत.
यापैकी जाधव हे संचालक असून पडवळ हे मुख्यअधिकारी व शैलेश भोसले हे चीफ अकाउंटट आहेत.
हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
आरोपींनी योजनाबद्धरितीने गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचून कर्जप्रकरणांचे बनावट दस्तऐवज करून खोटी कर्ज प्रकरणे केली. या प्रकरणांद्वारे ठेवीदारांच्या रकमेचा अपहार केला.
आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके (EoW dcp bhagyashree navtake) , सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद पाटील (ACP Milind Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सतिश वाळके, महेंद्र जगताप, महेश मते, कर्मचारी कोमल पडवळ यांनी तपास करून तयार केलेले पुरवणी
दोषारोप पत्र विशेष न्यायालयात दाखल केले.

 

Web Title : Pune Court | Supplementary chargesheet against MLA Anil Bhosale, Shailesh Bhosale, Mangaldas Bandal and 7 others in Shivajirao Bhosale Sahakari Bank embezzlement case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sleeping Tips | झोपेसंबंधी ‘या’ 5 चुकांमुळे येतंय अकाली वृद्धत्व, तरूण दिसण्यासाठी करा ‘ही’ सुधारणा; जाणून घ्या

Papaya Seeds | पोटातील जंत मारण्यासाठी पपईच्या बिया खाताहेत लोक, तज्ज्ञांनी दिला ‘हा’ इशारा; जाणून घ्या

Dizo Smartwatch | ‘डीझो’ने भारतात लाँच केल्या 2 बेस्ट स्मार्टवॉच; काय आहे किंमत? जाणून घ्या