Pune Court | महापुरूषाची बदनामी केल्याप्रकरणात महिलेचा जामीन अर्ज फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Court | फेसबुकवर (Facebook) महापुरूषाविषयी खोटी व बदनामीकारक पोस्ट टाकणार्‍या 38 वर्षीय महिलेचा जामीन अर्ज न्यायालयाने (Pune Court) फेटाळून लावला. न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर (Judge B. P. Kshirsagar) यांनी हा आदेश दिला. याबाबत 30 वर्षीय व्यक्तीने लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे.

19 जुलै ते 19 ऑगस्ट दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या तिने जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केला. त्यास सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल (Government Advocate Premkumar Agarwal) यांनी विरोध केला. आरोपीने धार्मिक भावना दुखवून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा पोस्ट फेसबुकवर केल्या आहेत. तिला जामीन मंजूर झाल्यास ती अशाच आक्षेपार्ह पोस्ट करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची शक्यता आहे. संबंधित पोस्टच्या अनुषंगाने तांत्रिक तपास करणे बाकी आहे. तिला जामीन दिल्यास ती साक्षीदारांना धमकाविण्याची शक्यता आहे. गुन्हयाचा तपास करून आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर करणे असल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. अगरवाल यांनी केला. न्यायायलयाने तो मान्य करत जामीन अर्ज फेटाळला.

Web Title : Police Inspector Transfer | kondhwa and faraskhana police station, two inspector transfer

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

IRDAI ने Bharti AXA-ICICI Lombard डील करता दिली मंजूरी, जनरल इन्श्युरन्स व्यवसायाच्या बाहेर पडणार ‘भारती एक्सा’

Rupali Chakankar | ‘देशातील महिलांची फसवणूक केली म्हणून पंतप्रधानांवर गुन्हाच दाखल करायला हवा (व्हिडिओ)

6 लाखाच्या फायद्यासाठी Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये करा गुंतवणूक; 5 वर्षातच मिळेल मोठा रिटर्न, जाणून घ्या