Pune Court | अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात विश्रांतवाडी-धानोरी परिसरातील एका महिलेसह दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   Pune Court | सोसायटीमध्ये सॅनिटायझर फवारणीवरून झालेल्या वादातून दाखल अ‍ॅट्रोसिटीच्या (atrocity act) गुन्ह्यात न्यायालयाने दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश शरयू सहारे (District and Special Sessions Judge Sharu Sahare) यांनी हा (Pune Court) आदेश दिला.

वैशाली बळीराम मोरे Vaishali Baliram More (वय 56) व सचिन सुरेश शिंदे Sachin Suresh Shinde (वय 37 दोघे रा;धानोरी पुणे) अशी अटकपूर्व जामीन मंजूर केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत एका वकिलाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी व आरोपी हे एकाच सहकारी गृहरचना संस्थेमध्ये वास्तव्यास आहेत.
२९ सप्टेंबर 2020 रोजी सोसायटी मध्ये सॅनिटायजर फवारणी करावयाची होती. वैशाली यांचे पती बळीराम मोरे हे सोसायटीचे अध्यक्ष आहेत.
बळीराम मोरे हे अध्यक्ष पदावर कार्यरत असताना फवारणीची गाडी सोसायटीमध्ये आल्यानंतर वैशाली यांनी फिर्यादी यांच्या जातीचा उल्लेख करीत याच्या
घरावर प्रथम फवारणी करा म्हणजे सर्व सोसायटी करोनामुक्त होईल, असे जातीय वाचक व अपमानास्पद विधान केले.

त्यावरून फिर्यादी यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या गुन्ह्यात चार आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती.
तर या दोन्ही आरोपींना विश्रांतवाडी पोलीसांनी फरार घोषित केले होते.
दोन्ही आरोपींच्या वतीने अ‍ॅड. मिलिंद पवार (adv milind pawar) यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
या प्रकरणी तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र दाखल झाले आहे. आरोपींना अटक करून काहीच तपास करावयाचा नाही किंवा आरोपींच्या ताब्यातून काही जप्त करावयाचे नाही.
असा युक्तिवाद दोन्ही आरोपींच्या वतीने अ‍ॅड. पवार यांनी केला.

 

Web Title : Pune Court | Two women, including a woman from Vishrantwadi-Dhanori area, granted pre-arrest bail in atrocity case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Kolhapur Anti Corruption | लाच घेताना पोलिसासह दोन पंटर अँटी करप्शनच्या जाळ्यात

Gold Price Today | चांदीत मोठी घसरण, सोन्याचे दर पुन्हा उतरले; जाणून घ्या नवीन दर

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचं पुढचं टार्गेट जरंडेश्वर कारखाना; दिलं ‘या’ दिग्गजांना आव्हान