Pune : वर्षभरापुर्वी झालेल्या वादातून चौघांकडून चुलत भावाला बेदम मारहाण, लोणीकाळभोर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- एक वर्षांपूर्वी झालेल्या वादातून चौघांनी चुलत भावाला बेदम मारहाण केल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली आहे.

याप्रकरणी अविनाश काळभोर (वय 25) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार हर्षवर्धन काळभोर, युवराज काळभोर, शोएब पठाण व सागर पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी हे चुलत भाऊ आहेत. त्यांच्यात एक वर्षापूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाले होते. त्याचा राग मनात होता. दरम्यान तीन दिवसांपूर्वी फिर्यादी व त्यांचे चुलते सूरज काळभोर बोलत उभा असताना आरोपी तेथे आले. तर हर्षवर्धन याने कोयता काढत फिर्यादीवर वार केला. यावेळी फिर्यादी याचे चुलत चुलते भांडण सोडवण्यास आले असता त्यांस देखील मारहाण करत बिअरची बाटली मारून जखमी केले. तर इतर तिघांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.