दिलासादायक ! पुण्यातील वृद्धाश्रमातल्या 47 जणांची ‘कोरोना’वर यशस्वी मात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढल्याने त्या कोरोनाच्या विळख्यात अनेकजण सापडत आहेत. पुण्यातील वेल्हे येथील एक दिलासादायक बातमी समोर आलीय. येथील वृद्धाश्रमातील बुधवारी २१ एप्रिल रोजी तब्बल ४७ जणांनी कोरोनातुन यश मिळवले आहे. कोरोनावर मात करून जगण्याला आणखी एकदा उत्तेजन दिले आहे. रानवडी येथील जनसेवा फाउंडेशनच्या वृद्धाश्रमातील ४७ कोरोना रुग्णांनी १३ दिवसांनंतर कोरोनाला हरवून पुन्हा वृद्धाश्रमात प्रवेश केला आहे.

येथील वृद्धाश्रमात ४७ जण वयस्कर आहेत, त्यामधील काही वृद्धांना बेडवरुन इकडेतिकडे सुद्धा हलायला येत न्हवते. एवढी परिस्थिती किंवा एवढं वय असून सुद्धा कोरोनाशी सामना करून त्यांनी एकदा लढाई जिंकली आहे. त्यातील अनेकांना विविध व्याधी आहेत. अशामध्येच त्यांनी त्या संकटाला तोंड देत यशस्वी झाले आहे. तर ज्यावेळी या वृद्धाश्रमातील पहिला वृद्धाला कोरोनाची लागण झाली. तेव्हा प्रशासनाने आणि आरोग्य यंत्रणेने तात्काळ धडपड करून वृद्धाश्रमातील १६५ वृद्धांची चाचणी करण्यात आली. त्यामधील ४७ जणांचा अहवाल सकारात्मक आला. या वृद्धाची अवस्था हो बिकट आणि गंभीर होती. तसेच आरोग्य प्रशासनावर एक आव्हान होत. तरी त्यांना यश आलं आहे.

दरम्यान, आरोग्य, महसूल, पोलीस विभाग या सर्वांनी अहोरात्र कष्ट घेत वृद्धांची काळजी घेऊन त्यांना या गंभीर आजारातून सुखरूप बाहेर काढले. यंत्रणांनी मनुष्यबळ कमी असतानाही ४७ जणांनी कोरोनावर मत केली. आपत्तीच्या काळात वेल्हे प्रशासन अतिशय खडतर परिश्रम घेत आहे जीवाची पर्वा न करता वृद्धांची रुग्णांची काळजी घेत आहे, असे वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले, भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कुमार जाधव, वेल्हेचे तहसीलदार शिवाजी शिंदे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, आरोग्य अधिकारी अंबादास देवकर, एपीआय मनोहर पवार आणि त्यांच्या पथकाने परिस्थितीत चांगली कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले आहे.