Pune : महाराष्ट्रासाठी कोविड लस पंतप्रधानांनी उपलब्ध करून द्यावी – कोमल सावंत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोविड लस तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नागरिक शेतकरी संघाच्या महिला अध्यक्षा कोमल सावंत यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सावंत म्हणाल्या की, कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असून, नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार च्या माध्यमातून कोवीड लसीकरण दिले जात आहे. मात्र, ती अपुरी पडत असल्याने त्याचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील सर्व व्यक्तीना लस देण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली पाहिजे. केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेऊन अद्यादेश जारी करण्याची गरज निर्माण झाली आहे. सर्व वयोगटातील व्यक्तीला कोरोनावरील लस दिली गेली तर कोरोना आटोक्यात येईल, त्यासाठी लस देण्याची गरज आहे, असे त्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे.