Pune : पुणेकरांची कामे लवकर व्हावेत म्हणून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून SOP, परवानगीची फाईल थेट संबंधित अधिकाऱ्याच्या टेबलवर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणेकरांचे काम जलद व्हावे यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी “एसओपी” (स्टँडर्ड ऑफ फॉरमॅट) तयार केली असून, आता यापुढे परवानगीच्या फाईल इतरत्र कोठेही न फिरता थेट संबंधित अधिकाऱ्यांच्या टेबलवर जाणार आहेत. यामुळे पुणेकरांच्या कामे लवकर होणार आहेत.

शहरात होणारे विविध कार्यक्रमांसह वाहतूकीच्या संदर्भातील वेगवेगळ्या परवानगीसाठीच्या अर्ज व फाईल पोलीस आयुक्तालयात जमा करण्यात येतात. त्यावर संबंधित अधिकारी परवानगी देतात किंवा काही त्रुटी असल्यास नाकारतात. त्यासाठी बराच कालावधी लागतो. विनाकारण या फाईल्स संबंधित नसलेल्या टेबलावर राहतात. त्यामुळे किरकोळ परवानगीसाठी अनेकांना महिन्याभराची वाट पाहावी लागत. फायलींचा विनाकारण प्रवास वाढल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. पोलीस आयुक्तांच्या या एसओपीनुसार फाईल लवकर क्लेअर होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे थेट पाठविली जाणार आहे.

त्यामुळे वेळ वाचण्यास मदत होणार असून नागरिकांचे हेलफाटे वाचणार आहेत. विशेषकरून गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी, विविध मिरवणूका, राजकीय सभांच्या परवानगी व पोलीस आयुुक्तालयात दाखल केलेल्या फाईलींचा प्रवास कासवगतीने होत होता. मात्र, आता फायलींचा प्रवास थांबणार आहे. त्याशिवाय पोलीस कर्मचाNयांच्या भविष्य निर्वाह निधी, मेडीक्लेम, सेवानिवृत्ती फंड संदर्भातील सर्व फायलींना तातडीने क्लेअर करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

फायलींचा वेळ तीन ते चार दिवसांचा निश्चीत केला आहे. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्याकडे फाईल पाठविली जाणार आहे. त्यावर तातडीने योग्य ती कारवाई केली जाईल. त्यामुळे आता विविध परवानग्या सोपस्कररित्या पुर्ण होणार आहेत, असे प्रशासन अप्पर पोलीस आयुक्त डॉ. जालींदर सुपेकर यांनी सांगितले.