Pune CP Amitabh Gupta On Traffic | पुणे शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांचे मोठे पाऊल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune CP Amitabh Gupta On Traffic | गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात अभूतपुर्व वाहतूक कोंडी (Pune Traffic Jam) होत असतानाही ‘निद्रीस्त’ असलेले वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे (DCP Rahul Shrirame) आणि त्यांच्या सहकार्‍यांची गंभीर दखल अखेर पोलिस आयुक्तांनी घेतली. सर्वच स्तरातून टीका आणि संताप व्यक्त होउ लागल्याने अखेर आज श्रीरामे यांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navatke) यांची नियुक्ती करत श्रीरामे यांचा ‘पंचनामा’च केला आहे. तसेच प्रत्येक पोलिस ठाण्यातील एक अधिकारी आणि आठ कर्मचार्‍यांना त्याच भागातील वाहतूक शाखेशी (Pune Traffic Branch) संलग्न करून वाहतूक नियंत्रणासाठी अधिकचे मनुष्यबळही उपलब्ध करून दिले.

कोरोनाचा लॉकडाउन संपल्यानंतर शहरातील वाहतूक पुर्ववत झाली आहे. परंतू कोरोनापुर्वीपेक्षा वाहतुकीची कोंडी सातत्याने होत असताना नियंत्रणासाठी वाहतूक पोलिस कुठेच दिसत नाहीत. अशातच पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्याप्रमाणावर खड्डे पडल्याने वाहतुकीची गती मंदावून शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून अभूतपुर्व वाहतूक कोंडी होत आहे. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर खरेदीसाठी होणार्‍या गर्दीमुळेतर अवघे एक कि.मी. अंतरासाठी दीड ते दोन तास लागत असल्याने पुणेकरांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. अशी परिस्थिती असताना वाहतूक पोलिस वाहतूक नियंत्रण करण्याऐवजी आडोशाला ‘चिरीमिरी’चे उद्योग करत असल्याचे दृश्य ठायीठायी पाहायला मिळत आहे. पारदर्शक कारभाराचे दाखले देणार्‍या गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातही वाहतूक पोलिसांची ही कार्यपद्धती राहील्याने पुणेकर शिव्यांच्या लाखोल्या वाहातच कोंडीतून मार्गक्रमण करत आहेत.

 

दरम्यान, सोमवारी झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना वाहतूक कोंडीबाबत जाब विचारला. त्यावेळी पाटील यांनी वाहतूक पोलिसांसाठी अतिरिक्त मनुष्यबळ म्हणुन ट्रॅफीक वॉर्डनची नियुक्ती करण्यात येईल. तसेच दिवाळीच्या काळात वाहन चालकांवरील दंडात्मक कारवाई थांबिवण्याचे आदेश दिले. १७ ऑक्टोबरला झालेल्या ढगफुटीनंतर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने देखिल वाहतूक सुरळित ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे पत्र लिहून पोलिस उपायुक्त श्रीरामे यांना एक प्रकारे कर्तव्याची जाणीव करून दिली. भाजपचे (BJP) शहरअध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेउन वाहतूक सुरळीत करण्याबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली. तर खासदार सुप्रिया सुळे यांचा देखिल वाहतूक कोंडीतून वाहने बाजूला करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचा फोटो व्हायरल झाला. तर गुरूवारी एका संस्थेने आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या जाहीर मुलाखतीचे आयोजन केले होते. या मुलाखती दरम्यान वाहतुकीसंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नांवर गुप्ता यांनीच आपण असमाधानी असल्याचे स्पष्ट केले.

अखेर पोलिस आयुक्त अमिताथ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी आज राहुल श्रीरामे यांच्या कामकाजावर देखरेख
ठेवण्यासाठी आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या कार्यक्षम पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांची नियुक्ती केली.
श्रीरामे यांनी वाहतुकीसंदर्भात केलेले कामकाज आणि कर्तव्याबाबतचा अहवाल नवटके यांना सादर करायचा असे
आदेश दिले. सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी देखिल शहरातील अ व ब दर्जाच्या पोलिस ठाण्यातील एक
अधिकारी आणि आठ कर्मचार्‍यांना त्याच पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाहतूक पोलिस शाखेशी संलग्न करण्याचे
आदेश देत वाहतूक नियंत्रणासाठी अधिकची कुमक उपलब्ध करून दिली आहे.

 

Web Title :- Pune CP Amitabh Gupta On Traffic | big step of police commissioner amitabh gupta to smooth traffic in pune city

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा