Pune CP Amitabh Gupta On Traffic | पुणे शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांचे मोठे पाऊल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune CP Amitabh Gupta On Traffic | पुण्यातील वाहतूक कोंडीवर (Pune Traffic Jam) उपाय शोधण्यासाठी भाजपच्या (BJP) शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांची नुकतीच भेट घेतली होती. शहरातील वाहतुकीची कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी अधिक वाहूतक पोलिसांची गरज आहे, त्यामुळे वाहतूक पोलिसांची संख्या वाढवावी, अशी मागणी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे करण्यात आली होती. त्यावेळी तातडीने वाहतूक पोलिसांची अतिरिक्त कुमक उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी दिली होती. यानंतर आता पोलीस आयुक्तांनी मोठे पाऊल उचलले आहे. (Pune CP Amitabh Gupta On Traffic)

 

पुणे शहरातील वाहतुक सुरळीत होण्यासाठी वाहतूक शाखेचे (Pune Traffic Branch) पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे (DCP Rahul Shrirame) यांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navatke) यांची नियुक्ती केली आहे. पुण्यातील वाहतुकीसंदर्भातील माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे हे भाग्यश्री नवटके यांना देतील. तसेच कामकाज आणि कर्तव्याबाबत अहवाल सादर करतील, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शुक्रवारी (दि.21) काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

भाजपच्या शिष्टमंडळाने शहारातील सर्व चौकांचे स्वतंत्र संस्थेमार्फत सर्वेक्षण करावे.
ज्या चौकामध्ये वाहतुकीची कोंडी होते, त्याची कारणे शोधावीत आणि त्यावर तातडीने उपाययोजना करावी,
अशी मागणी केली होती. त्याला पोलीस आयुक्त गुप्ता यांनी तत्वत: मान्यता दिली.
तसेच वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी 400 वॉर्डनची नियुक्ती करण्यात येणार आहे.

 

Web Title :- Big step of Police Commissioner Amitabh Gupta to smooth traffic in Pune city

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Gold Rate Today | ‘सुवर्ण’संधी! दिवाळीत खरेदी करा स्वस्त दरात सोने-चांदी, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Eknath Khadse | फोन टॅपिंग प्रकरण : रश्मी शुक्ला यांची सुटका झाल्यावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया, म्हणाले- ‘अलीकडच्या काळात…’

Pune Crime | न्यायालयाने फटकारल्यानंतर हडपसर पोलिसांनी बलात्कार प्रकरणी दाखल केला गुन्हा

Pune ACB Trap | कोंढवा पोलिस ठाण्यातील महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकासह कर्मचारी 50 हजारच्या लाचप्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘जाळयात’, प्रचंड खळबळ