पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune CP Amitesh Kumar | सायबर गुन्हेगार (Cyber Thieves) नागरिकांना लुबाडण्यासाठी नवनवीन पद्धतींचा अवलंब करत असल्याचे पाहायला मिळत आहे (Cyber Crime Pune). सोशल मीडिया (Social Media) आणि इंटरनेटच्या दुनियेत रोज फसवणुकीच्या घटना घडत असतात (Online Cheating Fraud Case). अनेक वेळा मोबाईल हॅक करुन मित्र-मैत्रिणींना अडचणीत असल्याचे मेसेज करुन त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जाते. अशा घटना रोजच घडत असतात, मात्र, अशीच घटना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या बाबतीत घडली आहे. अमितेश कुमार यांचा फोटो आणि नावाचा गैरवापर करत पैशाची मागणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा फोटो डीपीवर ठेवून लोकांकडून पैशाची मागणी होत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भातील आपल्या व्हॉट्सअॅपला स्टेटस ठेवून नागरिकांना माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या व्हॉट्सअॅपला स्टेटसमध्ये माझ्या फोटोचा गैरवापर करुन नागरिकाकडून पैशाची मागणी होत आहे तरी अशा पद्धतीची कुठली रिक्वेस्ट किंवा मेसेजला रिप्लाय करु नका अशी विनंती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली आहे.
आपल्या नावाचा आणि फोटोचा वापर करुन सोशल मीडियावर पैसे मागितले जात असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली आहे. त्यांनी व्हॉट्सअॅपला स्टेटसमध्ये अशा गोष्टींना बळी पडू नका असे आवाहन नागरिकांना केले आहे.
स्टेटस मध्ये काय म्हटले?
माझ्या फोटोचा वापर करुन कोणीतरी पैशांची मागणी करत आहे. कोणीही याला बळी पडू नका. पैसे देऊ नका किंवा अशा कोणत्याही रिक्वेस्टला किंवा मेसेजला रिप्लाय करु नका.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Ambegaon Pune Crime News | पुणे: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार, आंबेगाव परिसरातील घटना
Swargate Pune Crime News | पुणे: परप्रांतियाकडून कॅब चालकाची फसवणूक, गुन्हा दाखल