Pune CP Amitesh Kumar | पुणे पोलिसांनी दिल्लीमध्ये केलेल्या छापेमारीत 970 किलो एमडी जप्त ! आतापर्यंत एकुण 3500 कोटीचं 1700 किलो एमडी जप्त, केमिकल एक्सपर्टसह 8 जणांना अटक – पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Video)

पुणे : नितीन पाटील – Pune CP Amitesh Kumar | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) राजधानी दिल्लीमध्ये छापेमारी (Pune Police Raids In Delhi) करून तब्बल 970 किलो एमडी जप्त केले असून त्याप्रकरणी 5 जणांना अटक केली आहे. दिल्ली येथील कुरिअर कंपनीमधून लंडन येथे देखील पार्सलने एमडी Mephedrone (MD) गेल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुणे शहरातील विश्रांतवाडी, पुणे ग्रामीणमधील कुरकुंभ आणि दिल्लीमधून एकुण 1700 किलो एमडी जप्त केले असून त्यामध्ये 8 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये एका केमिकल एक्सपर्टचा देखील समावेश असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.(Pune CP Amitesh Kumar)

पुणे शहरातील विश्रांतवाडी आणि इतर भागातून तसेच पुणे जिल्हयातील कुरकुंभ येथील एका कारखान्यातून पुणे पोलिसांनी एकुण 717 किलो एमडी जप्त केले आहे तर दिल्लीमधून 970 किलो असे एकुण 1700 किलो एमडी जप्त केले असून त्याची किंमत ही 3500 कोटी रूपये आहे. पुणे पोलिसांची पथके देशातील 12 ते 15 शहरात सर्च ऑपरेशन करीत आहेत. सांगली येथे देखील पुणे पोलिसांची कारवाई सुरू आहे.

आतापर्यंत ड्रग्ज प्रकरणात एकुण 8 जणांना अटक करण्यात आली आहे. हे ऑपरेशन अजून देखील सुरू असून याची
व्याप्ती वाढत जात आहे. पुणे पोलिसांनी एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

ड्रग्ज रॅकेट चालविणार्‍यांची पाळमुळं शोधल्याशिवाय पुणे पोलिस गप्प बसणार नाहीत.
दरम्यान, दिल्ली येथील कुरिअर कंपनीमधून देशाबाहेर देखील ड्रग्ज सप्लाय झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त प्रविण पवार, अप्पर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर आणि
सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे तसेच इतर पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून मेफेड्रॉन जप्त, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : कोंढव्यात घरकाम करणाऱ्या मुलीवर बलात्कार

पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती गॅस छोट्या सिलेंडरमध्ये भरुन चोरी; लोखंडी पिनद्वारे करत होता गॅस ट्रान्सफर

पुणे : घरच्यांना मारुन टाकण्याची धमकी, ट्यूशनला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत भररस्त्यात गैरवर्तन