Pune CP Amitesh Kumar | अवैध धंद्यांना मुक संमती देणार्‍या तसेच त्यामध्ये प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या सहभागी असणार्‍यांवर कठोर कारवाई करणार – पोलिस आयुक्त अमितेश कुमार

पोलिसांकडून बडया क्लब चालकांची गुन्हे शाखेत परेड, प्रेमाने सांगतोय पण कुणाला आगीसोबत खेळण्याचा शोक असेल तर त्यांनी….

रात्री दीड वाजल्यानंतर शहरातील पब्ज पुर्णपणे बंद राहणार, रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून गुन्हा घडल्यास संबंधित पोलिस अधिकार्‍यांना उत्तर द्यावे लागेल

पुणे : (नितीन पाटील) – शहरातील अवैध धंद्यांना मुक संमती देणार्‍या तसेच त्यामध्ये प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या सहभागी असणार्‍यांवर (पोलिस कर्मचारी तसेच अधिकार्‍यांवर देखील) कठोर कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील पब्ज रात्री दीड नंतर पुर्णपणे बंद राहणार असून कोणाला जर प्रेमाची भाषा समजत नसेल तर त्यांनी त्यांचा आगीसोबत खेळण्याचा शोक पुर्ण करावा असा सज्जड दमच पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी दिला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडण्यासाठी पुणे पोलिस तत्पर असून त्या दृष्टीकोनातून मंगळवारी आयुक्तालयात बैठक ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये आपण स्वतः पोलिस अधिकार्‍यांना सूचना करणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

शहरात मोठ-मोठे क्लब चालविणार्‍याची गुन्हे शाखेत परेड घेण्यात आली. आगामी काळात शहरात कुठलेही अवैध धंद्ये चालु राहणार नाहीत. एका दिवसात सर्वच प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझ्याकडे काही जादूची कांडी नसल्याचे देखील आयुक्तांनी स्पष्ट केले. मात्र, पुणे पोलिसांच्या कामांमध्ये पारपदर्शकता राहणार असून परिणामकारक पोलिसींग करण्यावर आमचा भर असणार आहे असे त्यांनी सांगितले. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून देखील पुणे पोलिस योग्य ती पावले उचलणार असून आवश्यक तिथे दामिनी पथकाची पेट्रोलिंग वाढविण्यात येणार आहे.

रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून (तडीपार, पॅरोलवर सुटलेले, खुन, खुनाचा प्रयत्न तसेच गंभीर गुन्हयातून जामिनावर असलेले) गुन्हा घडल्यास त्याबाबतचे उत्तर संबंधित पोलिस अधिकार्‍यांना (संबंधित पोलिस स्टशेनच्या तपास पथकास (डीबी) विचारण्यात येणार आहे. कोम्बींग करताना केवळ गुन्हेगार आढळून आलेत की नाही हे तपासले जाणार नसुन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

तडीपार गुन्हेगार शहरात आढळून आल्यास त्याच्यावर तर कारवाई होणारच आहे पण संबंधित पोलिस स्टेशनच्या अधिकार्‍याकडे त्याबाबत त्याच्यासंबंधीची विचारणा देखील करण्यात येणार आहे.

शहरातील अवैध धंद्यांना मुक समंती देणार्‍या तसेच त्यामध्ये प्रत्यक्ष अथवा अपत्यक्षरित्या सहभागी असणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

5 वर्षापेक्षा अधिक काळ झालेल्यांची बदली

5 वर्षापेक्षा अधिक काळ एकाच पोलिस स्टेशन अथवा एकाच विभागात (गुन्हे शाखा / वाहतूक शाखा / विशेष शाखा / मुख्यालय) कर्तव्य बजाविणार्‍या पोलिस कर्मचारी तसेच अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. आज-उद्यामध्ये 77 पोलिस उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट सांगितले आहे.

प्रत्येक झोनमध्ये दरबार घेण्यात येणार

पोलिस कर्मचारी तसेच पोलिस अधिकार्‍यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये तसेच इतर शाखांमध्ये पोलिस आयुक्त अमितेश कुमार हे स्वतः दरबार घेणार आहेत. पोलिस कर्मचारी आणि अधिकार्‍यांच्या समस्या समजून घेणे देखील महत्वाचे असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्राधान्य

शहरात ज्या-ज्या प्रमुख चौकामध्ये वाहतूक कोंडी होते. त्याच्या वेळा काय आहेत, ती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याच संदर्भात मंगळवारी पोलिस आयुक्तालयात वाहतूक शाखेच्या अधिकार्‍यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. वाहतूक कोंडी होणार्‍या प्रमुख चौकांची यादी काढून त्यावर तोडगा काढण्यात येणार आहे.

सायबर क्राईम कंट्रोल करण्यासाठी तज्ञांची मदत घेणार

सायबर गुन्हयांची संख्या लक्षात घेता सायबर पोलिस ठाण्यात आणखी पोलिस कर्मचारी आणि अधिकार्‍यांची नेमणुक करण्यात येणार आहे. आऊटसोर्सिंग करून तज्ञांची मदत देखील घेण्यात येणार आहे. हे सर्व काही एकाच दिवसात होणार्‍या गोष्टी नाहीत. त्यामुळे या सर्व गोष्टींना काहीसा कालावधी लागणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | प्राचीन भारताविषयी जागृती करण्यात हेरिटेज सेंटर मोलाची भूमिका बजावेल – नितीनभाई देसाई, ज्येष्ठ उद्योगपती

यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या ( PI, API) बदल्या व नेमणूका

Uddhav Thackeray | ”फडणवीस कुठे आहेत? मी ऐकले लापता आहेत”, भाजपा आमदार गोळीबार प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा घणाघात

Pune Police News | पुणे शहरातील 77 सहाय्यक पोलिस निरीक्षक / पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या होणार