पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्याकडून कर्मचारी अन् अधिकार्‍यांची प्रशंसा, म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तुम्ही करत असलेले कार्याची तुलना ” युद्धभूमीशी” करावी लागेल. आपण करणाऱ्या कार्याला शब्द नाहीत, असे भावनिक होऊन पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ के. व्यकंटेशम यांनी कोरोनविरुद्ध लढणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची प्रशंसा केली आहे. तसेच त्यांना सोशल डिस्टिंग सांभाळून कार्य करण्याचे आवाहन देखील केले आहे.

देशभरात कोरोना आजाराने थैमान घातले आहे. देश लॉकडाऊन केला आहे. राज्यात संचारबंदी आणि कर्फ्यु लागू केला आहे. नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई केली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू असून खूपच गरज असल्यास नागरिकांनी बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. मात्र त्यानंतर देखील नागरिक बाहेर पडत आहेत. त्यांच्यावर पोलीस कारवाई करत आहेत. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. हॉटस्पॉट असणाऱ्या ठिकाणी पोलीस कर्तव्य बजावत आहेत. याकालावधीत कर्तव्य पार पाडत असताना पुण्यातील 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची देखील आयुक्त स्वत: आणि वरिष्ठ अधिकारी काळजी घेत आहेत.

दरम्यान कोरोनाशी दोन हात करून 24 तास आपले कर्तव्य बजावणाऱ्या या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची पोलीस आयुक्त डॉ. के. व्यकंटेशम यांनी प्रशंसा केली असून त्यांचे मनोबल वाढविले आहे. तसेच त्यांना मास्क, सॅनीटायझर आणि सोशल डिस्टिंग पाळण्याचे आवाहन करत कर्तव्य पार पडण्यास सांगितले आहे.

पोलीस आयुक्त यांनी एकपत्र आपल्या सर्व पोलिसांसाठी लिहीले आहे. त्यात “पोलीस दलाचा खरा कणा असलेले तुम्ही सर्वजण ज्या धीराने सध्या कर्तव्य बजावत आहात, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शब्द कमी पडत आहेत. गेल्या सव्वा महिना कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पोलीस म्हणून आपण आपले कर्तव्य पार पाडत आहात. लॉकडाऊनची अंमलबजावणी करताना नाका-नाक्यावर चेकिंग पोस्टवर, वस्त्या-वस्त्यांवर जाऊन उन्हा-तान्हात व रात्रंदिवस आपण ज्या कर्तव्यभावनेने व ज्या सेवेभावी वृत्तीने आपले कर्तव्य बजावत आहात, याची तुलना युद्धभूमीच करावी लागेल, असे भावनिक शब्द त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांशी काढले आहेत.

त्यासोबतच आयुक्तांनी “हम होंगे कामयाब एक दिन. मन मे है विश्वास, पुरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन” असा विश्वास व्यक्त केला आहे.