अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा – पोलीस आयुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी सोशल मिडीयावरून पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर नजर ठेवणे, पैसे वाटपाच्या तक्रारी असे गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष पथके तयार केली आहेत. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांना गैरप्रकारांची माहिती द्याावी.तसेच निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी केले. पोलीस आयुक्तालयात शहरातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची बुधवारी बैठक आयोजित केली होती तेव्हा ते बोलत होते.

यावेळी  योगेश गोगावले, चंद्रकांत मोकाटे, प्रशांत बधे, अजित दरेकर, रणजीत गायकवाड, मीरा शिंदे, छाया जाधव, प्रा. अजित अभ्यंकर,  योगेश पांडे, सुधाकर फुले, , अजय शिंदे, बाळा शेडगे, प्रशांत मते, संतोष नांगरे, भोलासिंग अरोरा तसेच सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप देशपांडे, विशेष शाखेचे उपायुक्त मितेश घट्टे, उपायुक्त स्वप्ना गोरे आदी उपस्थित होते.

महत्वाच्या नेत्यांच्या जाहीर सभांना शहरातील मैदानं उपलब्ध होत नसल्याने या सभा घेणे त्रासाचे ठरत आहे़ निवडणुक आयोगाच्या सहकार्याने पोलिसांनी स्टार प्रचारकांच्या सभेसाठी मैदाने उपलब्ध करुन द्यावीत, त्यासाठी भेदभाव केला जाऊ नये, अशी मागणी राजकीय पक्षांकडून बुधवारी पोलिसांकडे करण्यात आली़.तर  मेट्रोच्या कामामुळे नदीपात्रात यंदा सभेला परवानगी देण्यात येणार नाही असे पोलिसांना सांगितले.

पोलिसांकडून निवडणुक आणि मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी तयारी करण्यात आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांना गैरप्रकारांची माहिती द्याावी. तसेच शहरातील विविध प्रकारची परवानगी तसेच परवाने देण्यासाठी एक खिडकी योजना सुरु करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच पोलिसांनी दिलेल्या सूचना आणि आचारसंहितेचे पालन करुन सहकार्य करावे. गैरप्रकार आणि दिशाभूल करणाऱ्या संदेशांवर सायबर गुन्हे शाखेकडून नजर ठेवण्यात येणार आहे. समाजमाध्यमांतून पसरविला जाणाऱ्या अफवा रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.