Pune CP Retesh Kumaarr | रितेश कुमार यांनी स्विकारली पुणे पोलिस आयुक्तपदाची सूत्रे (VIDEO)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गृह विभागाने मंगळवारी (दि.13) राज्यातील वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या (Transfers Of IPS Officers In Maharashtra) बदल्या केल्या आहेत. सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक (Addl DGP, CID) रितेश कुमार (Pune CP Retesh Kumaarr) यांची पुणे पोलीस आयुक्तपदी (Pune Police Commissioner) नियुक्ती करण्यात आली. तर पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta) यांची मुंबईत कायदा व सुव्यवस्थाच्या अपर पोलीस महासंचालक पदी बदली करण्यात आली आहे. पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेश कुमार (Pune CP Retesh Kumaarr) यांनी आज (शुक्रवार) पदभार स्विकारला.

 

 

नवीन पोलीस आयुक्तांचा अल्प परिचय

अतिशय शांतपणे काम करणारे रितेश कुमार हे 1991 बॅचचे आयपीएस (Pune CP Retesh Kumaarr) अधिकारी आहेत. त्यांनी सांगली येथे पोलीस अधीक्षक (Sangli SP) म्हणून काम पहिले होते. मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात अतिरिक्त पोलीस आयुक्त (Addl CP) म्हणून त्यांनी काही काळ काम केले. राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (CID) ते पोलीस महानिरीक्षक म्हणून यापूर्वी काम केले आहे. त्यानंतर पुण्यातील बिनतारी संदेश विभागात अपर पोलीस महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. पुण्यात पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती होण्यापुर्वी रितेश कुमार हे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे म्हणजेच सीआयडीचे प्रमुख होते. सीआयडीचे प्रमुख आणि अप्पर पोलिस महासंचालक म्हणून त्यांनी सीआयडी विभागात कर्तव्य बजाविले.

 

 

बिनतारी संदेश विभागाचे अत्याधुनिकरण करण्याबरोबर देशपातळीवर सर्वाधिक उच्च तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करणारे राज्य व गोपनीयता राखण्यासाठी सर्वात सुरक्षित तंत्रज्ञान वापर असे दोन पारितोषिक मिळवून देण्यात पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यानंतर गेल्यावर्षी सीआयडीमध्ये बदली झाल्यावर रितेश कुमार यांनी गुन्हे निर्गती वेगवान होण्यासाठी प्रयत्न केले. सीआयडीमध्ये कार्यरत असताना रितेश कुमार यांनी संपुर्ण महाराष्ट्रात CCTNS/ ICJS ही प्रणाली यशस्वीपणे राबविली आहे. त्यासाठी देश पातळीवर त्यांचा आणि सीआयडीमधील इतर अधिकार्‍यांचा केंद्र सरकारकडून गौरव देखील करण्यात आला होता.

 

 

Web Title :- Pune CP Retesh Kumaarr | IPS Retesh Kumaarr Take Charge As A Pune Police Commissioner

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | “कुणालाही हे मान्य नाही की राजभवनात बसून…”, संजय राऊतांची राज्यपालांवर टीका

Governor Appointed MLA | राज्यपाल नियुक्त आमदारांची सुनावणी लांबणीवर, विधानपरिषद सभापतीपदाच्या निवडणुकीत ट्विस्ट

Sharad Pawar | उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो – शरद पवार