‘नाराज’ कर्मचार्‍यांना पोलिस आयुक्तांकडून नववर्षाचं ‘गिफ्ट’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस आयुक्तांनी गेल्याच महिन्यात स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रिडा संकुलात पोलीसांसाठी चला हवा येऊ द्या कार्यक्रम घेतला. पण, त्यात जागेच्या कमतरतेमुळे अनेकांचा हिरमोड झाला अन् नाराजीचा सुर उमटला होता. ही नाराजी दूर करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी पोलीसांसह त्यांच्या कुटूंबियासाठी पुन्हा एकदा “चला हवा येऊ द्या” टीमचा खुला कार्यक्रम आयोजित केला आहे.

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील ग्राऊंडवर हा कार्यक्रम दि. 24 डिसेंबर (मंगळवार) घेण्यात येणार आहे. सायंकाळी 6 ते 10 हा कार्यक्रम असणार आहे. गेल्या महिन्यात पोलीसांसाठी गणेश कला क्रिडा मंदिरात चला हवा येऊ द्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पासेसवर या कार्यक्रमाला प्रवेश देण्यात आला होता. कार्यक्रम पोलीसांसाठी होता. परंतु, त्याचे पासेस मात्र, अत्यल्प होते. त्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात 20 ते 25 पासेस दिले होते. साधारण एका पोलीस ठाण्यात 100 हून अधिक कर्मचारी आहेत. त्यामुळे अनेकांना पोलीस ठाण्यात चिठ्ठ्या टाकून हे पास वाटण्यात आले होते. तर, अनेक ठिकाणी वादाच्याही घटना घडल्या होत्या. या कार्यक्रमात आमंत्रित आणि निवृत्त अधिकारीही बोलविण्यात आले होते. त्यामुळे बसण्यासही जागा मिळाली नव्हती. त्यामुळे पोलीस दलात नाराजीचा सुर उमटला होता.

“काम करायचे आम्ही आणि कार्यक्रमाला तुम्ही”,  असे खासगीत बोलत होते. हा सर्व प्रकार पोलीस आयुक्तांच्या कानावर गेला. त्यानंतर त्यांनी पुन्हा कार्यक्रम घेण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानंतर मंगळवारी सर्वांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नव्या वर्षात पोलीस व त्यांच्या कुटूंबियासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचेच पासेस आहेत. परंतु, ते सर्वांसाठी असून, एका पासेसवर दोघांना प्रवेश दिला जाणार आहे. कार्यक्रम घेऊन आयुक्तांनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केली आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/