Pune : सराफी दुकानदाराचे 13 लाख रुपयांचे दागिने घेऊन कारागीर पसार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सराफी दुकानदाराने दागिने तयार करण्यासाठी सोने दिल्यानंतर कारागीर 13 लाख रुपयांचे दागिने घेऊन पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रविवार पेठेतील सराफाला कारागिराने गंडा घातला आहे.

या प्रकरणी अकबर ऊर्फ अतर रफीक मलिक (वय ३६ ) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत अभिजित घोरपडे (रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित यांचा ऑर्डरप्रमाणे सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडील सोने घेऊन दागिने बनविण्याचे काम अकबर काही महिन्यांपासून करीत होता. त्यामुळे अभिजितचा अकबरवर विश्वास होता. काही महिन्यांपूर्वी अकबरने दागिने बनविण्याच्या हेतूने अभिजित यांच्याकडून ३६३ ग्रॅम वजनाचे 12 लाख 92 हजार रुपयांचे सोने दागिने बनवून देण्यासाठी घेतले. पण दागिने घेतल्यानंतर त्याने हे दागिने परत न करता फसवणूक केली आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक अभिजित पाटील करत आहेत.