इंग्लंड – न्युझीलंड सामन्यावर ऑनलाईन ‘बेटींग’ घेणारे गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील इंग्लंड विरुद्ध न्युझीलंड सामन्यावर ऑनलाईन जुगार घेणारे आणि खेळणाऱ्या चौघांना आज (बुधवार) अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट -३ ने सिंहगड रोड येथील दामोदर विहार सोसायटीत केली. या कारवाई दरम्यान पोलिसांनी १ लाख १८ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सचिन वसंत चव्हाण (वय-३८ रा. दामोदर विहार सोसायटी), अमोद भगवंत खलदकर (वय-५० रा. नारायण पेठ एलआयसी बिल्डींग समोर, पुणे) यांना ऑनलाईन जुगार घेताना अटक करण्यात आली. तर राहूल गोरखनाथ जगताप (वय-३८ रा. काकडेनगर, कोंढवा बुद्रुक), पृथ्वीराज शंकर येळवंडे (वय-३८ रा. बुधवार पेठ) यांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले. अटक करण्यात आलेल्यांवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंहगड रोड येथील दामोदर विहार येथे आज सुरु असलेल्या इंग्लंड विरुद्ध न्युझीलंड सामन्यावर जुगार घेतला आणि खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार युनिट-३ च्या पथकाने याठिकाणी छापा टाकून दोघांना जुगार घेताना आणि दोघांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून लॅपटॉप, वेगवेगळ्या कंपन्यांचे ८ मोबाईल, १० हजार ९४० रुपयांची रोकड असा एकूण १ लाख १८ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -१ समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, राजकुमार केंद्रे, किरण अडागळे, पोलीस कर्मचारी किशोर शिंदे, दिपक मते, राहुल घाडगे, मेहबुब मोकाशी, रोहिदास लवांडे, प्रविण तापकिर, संदीप राठोड, विल्सन डिसोझा, सचिन गायकवाड, अतुल साठे, सुजित पवार यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी हे करीत आहेत.

एकाच वेळी अनेक लॅबमध्ये काम करणाऱ्या पाच पॅथॉलॉजिस्टचा परवाना रद्द

सावधान ! तर मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका, ‘ही’ आहेत कारणे

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

मदरशातील मुलींवर लैंगिक अत्याचार, व्यवस्थापकासह तिघांना अटक

महाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का ?