Pune Crime | निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या कुटुंबावर 1.20 कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अस्तित्वात नसलेल्या जमिनीच्या गहाणखताद्वारे सारस अर्बन को-ऑ क्रेडिट सोसायटीतून 1 कोटी 20 लाख रुपयांचे कर्ज घेवुन त्याचे हप्ते न भरता फसवणूक केल्याप्रकरणी निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या कुटुंबासह 6 जणांवर वारजे पोलिसांनी (warje malwadi police) गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

सचिन दत्तात्रय टेमघरे (वय 40), अमोल दत्तात्रय टेमघरे (वय 39), मनोज दत्तात्रय टेमघरे, मंगला दत्तात्रय टेमघरे (सर्व रा. इंद्रधनु सोसायटी, कोथरुड), भगवान विठोबा बराटे (रा. कृष्णकुुंज), गणेश भागोजी कराळे (वय 54) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी सारस अर्बन को ऑ क्रेडिट सोसायटीचे (saras urban co-operative credit society) वसुली अधिकारी नितीन जोरकर यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 13 एप्रिल 2014 पासून सुरु झाली आहे. सचिन, अमोल, मनोज आणि मंगला टेमघरे यांनी सारस अर्बनकडे वारजे गट क्ऱ 73 हिस्सा नं. 1 क्षेत्र 950 चौमी ही स्वत:चे मालकीची जमीन गहाण खताद्वारे संस्थेला लिहून दिली.

त्यावर संस्थेकडून 1 कोटी 20 लाख रुपयांचे कर्ज काढले. सुरुवातीला कर्जाचे हप्ते भरले. नंतर हप्ते भरणे बंद केल्यामुळे फिर्यादी यांनी या मिळकतीवर कारवाई सुरु केली असता ही मिळकत अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आले. सखोली चौकशी केली असताना चारही आरोपींनी इतर दोघा आरोपींशी संगनमत करुन खोटा व बनावट दस्त तयार करुन तो खरा असल्याचे भासवून संस्थेची फसवणूक केली आहे.

या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार संस्थेकडून अगोदर कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud
Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचवेळी न्यायालयाने कारवाई करण्यास
स्थगिती दिली होती. ही हद्द वारजे पोलीस ठाण्याच्या (Warje Malwadi Police Station)
हद्दीत येत असल्याने हा गुन्हा वारजे पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. दरम्यान, न्यायालयाची
स्थगिती उठविल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन टेमघरे यांनी दिलेली माहिती…

रीतसर जमीन तारण ठेऊन टेमघरे कुटुंबीयांनी 1 कोटी 20 लाख कर्ज घेतले होते … या रक्कमेपैकी 70 लाख फेडले आहेत. जेंव्हा आम्ही उरलेले 50 लाख रुपये देण्यास गेलो तेव्हा पतसंस्थेने आम्हाला 1 कोटी 68 लाख भरा नाहीतर क्रिमिनल केस करू असे सांगितले. आम्ही त्यांना तुम्ही तारण ठेवलेली जागा ताब्यात घ्या आणि पैसे वळते करून घ्या असे सांगितले असताना देखील त्यांनी आमच्यावर खोटी क्रिमिनल केस केली आहे …
या पतसंस्थेची ही जुनी वसुली पद्धत आहे आणि म्हणून पतसँस्थेवर चौकशीचे आदेश देखील अरगडे कोर्टाने एक महिन्या पूर्वी दिले आहे …
तरी आमच्यावर केलेला गुन्हा खोट्या स्वरूपाचा व नाव खराब करून पैसे वसूल करण्याच्या हेतूने केला आहे

हे देखील वाचा

Narayan Rane | ‘या’ अटीखाली नारायण राणे यांना मिळाला जामीन, जाणून घ्या

7th Pay Commission | ‘या’ कर्मचार्‍यांची 35 हजार रुपयांपर्यंत वाढली Salary, सरकारने पूर्ण केली मोठी मागणी

Pune Police Inspector Transfer | पुण्यात 3 पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | 1.20 crore fraud case filed against retired police inspector’s family

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update