Pune Crime | 60 हजारांवर पावणेदोन लाख व्याज ! धमकाविणारा खासगी सावकार अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | घराच्या बांधकामासाठी घेतलेले ६० हजार रुपयांच्या कर्जावर (Loan For House Construction) पावणे दोन लाख रुपये परत केल्यानंतरही आणखी दरमहा १० हजार रुपये व्याज देण्यासाठी धमकाविणार्‍या सावकाराच्या (Money Lenders Pune) गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने (Pune Police Crime Branch) मुसक्या आवळल्या. (Pune Crime)

 

अक्षय ऊर्फ भिमा पवार Akshay alias Bhima Pawar (वय ३३, रा. बी टी कवडे रोड, लक्ष्मीनगर – BT Kavde Road, Laxmi Nagar Pune) असे अटक केलेल्या सावकाराचे नाव आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी वानवडीतील एका ४० वर्षाच्या नागरिकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद Wanwadi Police Station (गु. रजि. नं. २३५/२२) दिली आहे.
हा प्रकार जून २०१९ ते १३ जून २०२२ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी घर बांधकामासाठी अक्षय पवार याच्याकडून ६० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.
त्यावरील व्याज म्हणून त्याने रोखीने ४८ हजार रुपये, दाजीकडून दिलेले ३ हजार रुपये व फोन पे, गुगल पेवरुन १ लाख २४ हजार ५०० रुपये असे एकूण १ लाख ७५ हजार ५०० रुपये दिले आहेत.
असे असतानाही त्याने फिर्यादी यांना यापुढे दरमहा १० हजार रुपये व्याज म्हणून दे अशी मागणी केली.
फिर्यादीला शिवीगाळ करुन तू पैसे दिले नाही तर तुझी मोटारसायकल घेऊन जाईन अशी धमकी दिली.
त्यामुळे त्यांनी अखेर पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिसांनी बेकायदा सावकारी करणार्‍या अक्षय पवार याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक शेळके अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title :-  Pune Crime | 1.75 lakh interest on 60 thousand Intimidating private lender arrested

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा