Pune Crime | पुणे-सोलापूर महामार्गावर पोलीस असल्याचे भासवून एसटी प्रवाशांचे सव्वा कोटी लुटले

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Crime | पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune-Solapur Highway) एसटी बसने प्रवास करणाऱ्या चौघांना तीन जणांनी पाटस (Patas Crime) येथे पोलीस असल्याची सांगत मारहाण करुन गाडीतून खाली उतरवले. चौघांना तुम्ही दोन नंबर धंदा करता, तुमची तक्रार आली होती, तुम्ही आज सापडला असे म्हणत हातातील फायबर काठीने मारहण करुन त्यांच्याकडील रोकड आणि किमती वस्तू असा एकूण सव्वा कोटी रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी मध्यरात्री पाटस येथे घडली.

ही घटना मंगळवारी (दि.3) रात्री 1.15 वाजण्याच्या सुमारास पाटस हद्दीतील ढमाले वस्तीजवळ घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. निलंगा-भिवंडी या एसटी बसमधून (Nilanga-Bhiwandi ST bus) कुरियर सर्व्हिस (Courier service) करणारे हितेंद्र जाधव (वाघोशी, ता. फलटण), विकास बोबडे, तेजस बोबड आणि संतोष बोबडे (तिघे. रा. फलटण, जि. सातारा) हे चौघे प्रवास करत होते. चोरट्यांनी त्यांच्याकडील 1 कोटी 10 लाख रुपये रोख व मेटल चोरुन नेले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी ढमाले वस्ती परिसरात रात्री एकच्या सुमारास आली असता या एसटीला चौघांनी अडवलं.
त्यांच्या हातात काठ्या, खाकी पँट परिधान केलेली आणि पायात बुट असा पेहराव असल्याने बस चालकाला पोलीस असल्याचे निदर्शनास आल्याने बस थांबवली.
तर वाहकाने बसचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच चौघांनी काठ्या आपटत शिवीगाळ करुन कुरियरवाले कोण आहेत, अशी विचारणा केली.
त्यावेळी बसमध्ये पाठिमागे बसलेले चौघेजण उठले.
त्यांच्या शर्टच्या कॉलर पकडत त्यांना एसटीमधून बाहेर काढले. आणि एसटी चालकाला (ST driver) जाण्यास सांगितले.
एसटी गेल्यानंतर चौघांना मारहाण करुन त्यांच्याकडील रक्कम आणि मेटल हिसकावून दोन दुचाकीवरुन पळून गेले.

 

Web Title : Pune Crime | 1 crore and 10 lakh theft st passengers showing police incident patas

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PM Kisan | खुशखबर! 12.11 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात येणार आहेत 2000 रुपये, चेक करा कधी येणार पैसे?

Pune Corporation | महापालिकेचे सह आयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती

Pune Crime | परदेशात नोकरीच्या अमिषाने फसवणूक करणाऱ्या महिलेला 16 वर्षांनी अटक