Pune Crime | पुण्यात 20 लाखांच्या कर्जाचे वसुल केले 1 कोटी; परतफेड केल्यानंतरही बायको-मुलीला धंद्याला लावण्याची धमकी; बेकायदा सावकारी करणार्‍या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime | व्यवसायासाठी वेळोवेळी २० ते २२ लाख रुपयांचे कर्ज घेऊन त्यावर तब्बल १ कोटी रुपयांची परतफेड केल्यानंतरही बायको मुलीला धंद्याला लावण्याची धमकी देण्याचा धक्कादायक (Pune Crime) प्रकार समोर आला आहे.. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी (Faraskhana Police Station) तिघांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार (maharashtra money lenders act) गुन्हा दाखल केला आहे.

राजेंद्र देवेंद्र (Rajendra Devendra), राजेश राजेंद्र (Rajesh Rajendra) आणि राजू ऊर्फ जॉन राजेंद्र देवेंद्र Raju alias John Rajendra Devendra (रा. मंगळवार पेठ) अशी गुन्हा दाखल (money laundering case) झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी सोलापूर बाजार (Solapur Bazaar) येथे राहणार्‍या ३९ वर्षाच्या तरुणाने फिर्याद दिली आहे. राजेंद्र देवेंद्र यांच्याकडे सावकारी व्यवसायाचा कोणताही परवाना नाही. असे असताना त्यांनी व्यवसायासाठी २०१२ मध्ये फिर्यादी यांना दाम दुप्पट व्याजाने कर्ज दिले. वेळोवेळी त्यांनी २० ते २२ लाख रुपये दिले. त्याबदल्यात फिर्यादी यांनी व्याजापोटी आतापर्यंत १ कोटी रुपये दिले आहेत. असे असतानाही ते सातत्याने पैसे मागत होते. पैसे दिले नाही तर शिवीगाळ करुन बायको मुलीला धंद्याला लावायची धमकी देत होते. त्यांच्या या त्रासाला कंटाळून त्यांनी गुन्हे शाखेकडे (Pune Police Crime Branch) तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

High Court | परवानगी शिवाय दुसरा विवाह करणारा शिक्षेस पात्र, जाणून घ्या हायकोर्टानं नेमकं काय म्हंटलंय

Mumbai Police | कौतुकास्पद ! नाल्यातून वाहत जात होतं ‘नवजात’ बाळ, ‘म्याव-म्याव’ करून मांजरांनी केलं अलर्ट, मुंबई पोलिसांनी अर्भकाला वाचवलं

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | 1 crore loan recovered in Pune; Threatening to take wife-daughter out of business even after repayment; Filed a case against Rajendra Devendra, Rajesh Rajendra and Raju alias John Rajendra Devendra illegal lenders in Faraskhana Police Station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update