Pune Crime | खरेदी केलेल्या ऊसाचे पैसे न देता शेतकऱ्याची 10 लाखांची फसवणूक, हवेली तालुक्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ऊसाच्या गुऱ्हाळासाठी घेतलेल्या ऊसाचे पैसे न देता शेतकऱ्यांची 9 लाख 80 हजारांची फसवणूक (Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार हवेली तालुक्यात घडला आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Pune Police) एकाच्या विरोधात गुन्हा (Pune Crime) दाखल केला.

 

या प्रकरणी भगवान काळे (वय ५५, रा. वाळकी, ता. दौंड, जि. पुणे ) यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत महेश परशुराम कोतवाल (वय ५५, रा. अष्टापुर, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

भगवान काळे शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करुन पुणे शहरातील रसवंतीगृह चालकांना ऊसाचा पुरवठा करतात.
काळे यांनी तीन वर्षांपूर्वी कोतवाल यांच्यासह पाच शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी केला होता.
त्यानंतर कोतवाल यांच्यासह पाच शेतकऱ्यांचे पैसे काळे यांनी थकविले. कोतवाल यांनी पैशांबाबत विचारणा केली.
तेव्हा काळे यांनी पैसे देण्याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. गेले दोन वर्ष कोतवाल यांच्यासह पाच शेतकरी काळे यांच्याकडे पाठपुरावा करत होते.

काळे यांनी नऊ लाख 80 हजार रुपये परत देण्यास टाळाटाळ केल्याने कोतवाल यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार (Senior Police Inspector Gajanan Pawar) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 10 lakh fraud of a farmer without paying for the purchased sugarcane, an incident in Haveli taluka

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bhaskar Jadhav | घरावरील हल्ल्यानंतर प्रथमच भास्कर जाधव माध्यमांसमोर; देवेंद्र फडणवीसांवर केले गंभीर आरोप

Vinayak Raut | शिवसैनिकांवरील हल्ल्याला आंदोलनाने उत्तर देऊ, खा. विनायक राऊत यांचा इशारा

Mallikarjun Kharge | मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेस पक्षाचा सुवर्णकाळ निर्माण करतील, मोहन जोशी यांच्याकडून खर्गेंना शुभेच्छा