Pune Crime | इन्कम टॅक्सच्या नावाने पुण्यातील प्रसिध्द डॉक्टरकडे 10 लाखाची खंडणीची मागणी; जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | तुमच्या विरोधात मुंबई आयकर विभागाकडे (Mumbai Income Tax Department) तक्रार आली आहे. हे मॅटर मिटवायचे असल्यास एक हाती 10 लाख रुपये द्यावे लागतील, नाही तर तुमच्यावर आयकराची कारवाई करणार अशी धमकी (Threat) शहरातील एका प्रसिद्ध डॉक्टरांना (Famous Doctors In Pune) दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी एका प्रसिद्ध हॉस्पिटलमधील मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) असलेल्या डॉक्टरांनी (Doctor) हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन श्रीकांत पांढरे Srikant Pandhare (वय 45 – गुन्हा दाखल असलेलं नावे), त्यांचा साथीदार आणि मोबाईलवरुन फोन करणारा किशोर जाधव (गुन्हा दाखल असलेलं नाव) अशा तिघांवर खंडणीचा (Ransom) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शुक्रवारी सायंकाळी हॉस्पिटलमध्ये असताना श्रीकांत पांढरे असे नाव सांगणारा एक जण साथीदारासह त्यांच्या ऑफिसमध्ये आला. त्याने तुमच्या विरोधात मुंबई आयकर विभागात तक्रार आली आहे, असे सांगितले. त्यानंतर त्यांना किशोर जाधव (Kishor Jadhav) असे नाव असलेल्या व्यक्तीने मोबाईलवर फोन केला. आयकर विभागाकडील हे मॅटर मिटवायचे असल्यास एक हाती 10 लाख रुपये एवढी मोठी रक्कम द्यावी लागेल, नाही दिले तर तुमच्यावर आयकर विभाग कारवाई करणार आहे, अशी धमकी दिली. त्यानंतर या डॉक्टरांनी हडपसर पोलिसांकडे तातडीने संपर्क करुन तक्रार दिली. पोलिसांनी खंडणीचा गुन्हा (Extortion Case) दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक शिंदे (API Shinde) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | 10 lakh ransom demand from famous doctor in Pune in the name of income tax Learn the case
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा