Pune Crime | जास्त परताव्याचे आमिष दाखवून कॉलेजमधील मित्रानेच घातला 10 लाखांचा गंडा; पुण्यातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ट्रेड पे कंपनीत (Trade Pay Company) गुंतवणूक केल्यास जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून कॉलेजमधील मित्राने (College Friend) दहा लाखांची फसवणूक (Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मित्राने मित्राविरुद्ध फिर्याद दिली असून, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार (Pune Crime) मे 2021 ते बुधवार (दि.6) या कालावधीत घडला आहे.

 

ओपिंदरसिंग प्रधानसिंग कांत (Opinder Singh Pradhan Singh Kant) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सुभाष वसंत खराडे (वय 65, रा. भोसलेनगर) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) बुधवारी (दि.6) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसी 406, 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे कॉलेजपासून मित्र आहेत. आरोपी याची ट्रेड पे कंपनी असून, त्याने फिर्यादी यांना पैसे गुंतवण्यास सांगितले. तसेच गुंतवलेल्या पैशावर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी यांनी आरोपीवर विश्वास ठेवून 10 लाख 35 हजार 800 रुपयांची गुंतवणूक केली. दरम्यान, फिर्यादी यांनी आरोपीकडे पैशांची मागणी केली असता त्याने दोन चेक दिले.

 

फिर्यादी यांनी आरोपीने दिलेले चेक बँकेत जमा केले. मात्र, ते बाऊन्स झाले.
त्यानंतर आरोपीने वेगवेगळी कारणे देत रक्कम देतो असे सांगितले.
परंतु अद्यापपर्य़ंत पैसे न देता फसवणूक केली. याबाबत फिर्य़ादी यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता.
तक्रार अर्जाची चौकशी करून बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक झरेकर (API Zarekar) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 10 lakh scam by a college friend with the lure of higher returns; Type in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | ‘तू माझ्या मित्राचा मर्डर केला, तुझी विकेटच पाडतो’ म्हणत तरुणावर हल्ला; हडपसर परिसरातील घटना

Driving Licence lost | ड्रायविंग लायसन्स हरवलंय? चिंता नको ‘हे’ करा

CM Eknath Shinde | गुजरात विधानसभेच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

SC On Property Dispute | सर्वोच्च न्यायालयाचा ज्येष्ठ नागरिकांना सल्ला; म्हातारपणाची काळजी घेतील, असे लिहून घ्या