Pune Crime | येरवडा जेलमधील मोक्कातील गुंडाचा वाढदिवस साजरा करणारे 11 समर्थक ‘गोत्यात’; पोलिसांनी दाखविला ‘हिसका’

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | खून (Murder) आणि मोक्का कारवाईमध्ये (MCOCA) येरवडा तुरुंगात (Yerwada Jail) असलेल्या भाईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आलेल्या समर्थकांवर दिघी पोलिसांनी (Dighi Police Station) कारवाई केली असून त्यातील तिघांना अटक (Pune Crime) केली आहे.

 

शुभम बलराम वाणी Shubham Balram Wani (वय २३, रा. दिघी) याचा २८ ऑक्टोबर रोजी वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे समर्थक दिघीतील परांडेनगर येथे रात्री साडेदहा वाजता जमले होते. बेकायदेशीर जमाव जमवून मास्क न घालता ते मिळून आले. त्यांच्याकडे लोखंडी कोयता व एक तलवार जप्त (Pune Crime) करण्यात आली आहे.

 

प्रशांत प्रकाश बुदुक (वय १९, रा. समर्थनगर कॉलनी), अभय गजेद्र खंडागळे (वय १९, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), प्रणव सतिश बारसे (वय १९, रा. आदर्शनगर, दिघी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अनिकेत यादगिरी, प्रसाद बुद्रुक, अक्षय गायकवाड, सुंदर गवळी यांच्यासह ११ जणांवर पोलिसांनी गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

मंगेश मोरे व त्याच्या साथीदारांनी भोसरी (Bhosari) येथे एका तरुणाचा टोळीच्या वर्चस्वातून गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये खून केला होता.
संघटीत गुन्हेगारीतून व आर्थिक फायद्यासाठी ही टोळी गुन्हे करीत असल्याने गेल्या वर्षी आक्टोबरमध्ये मंगेश मोरे
व त्याचे साथीदार अशा १० जणांवर मोक्काअंतर्गत पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे.
तेव्हापासून मंगेश मोरे याच्यासह शुभम वाणी हाही येरवडा तुरुंगात आहेत.

 

शुभम वाणी याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या समर्थकांनी दिघी परिसरात पोस्टर लावून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
त्यानंतर रात्री केक कापण्यासाठी ते जमले असताना पोलिसांनी कारवाई करुन त्यांच्याविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

Web Title :-Pune Crime | 11 supporters celebrating birthday of Mcoca criminal of Yerawada jail; dighi police take strong action

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा