Pune Crime | 45 वर्षीय ‘चाचा’कडून 12 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एका 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर एका व्यक्तीने लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे ऑनलाईन चॅटरुम (Online Chatroom) आणि मेसेंजर ॲपच्या (Messenger App) माध्यमातून या दोघांची ओळख झाली होती. पीडित मुलाच्या आईने याबाबत भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Bhosari MIDC Police Station) तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

पीडित मुलाच्या आईच्या तक्रारीवरुन 45 वर्षे वयाच्या ‘चाचा’ नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आपली खोटी ओळख सांगून ऑनलाइन चॅटिंग करणाऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. एफआयआरमधील माहितीनुसार, ‘चाचा’ अशी फेक ओळख सांगत या आरोपीने 8 मार्च रोजी मेसेंजर मोबाईल ॲपच्या माध्यमातून मुलाशी संपर्क साधला. त्यानंतर 9 मार्च रोजी आरोपी ‘चाचा’ या अल्पवयीन मुलाला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला. यावेळी त्या मुलाचे आई – वडील घरी नसल्याचा फायदा घेत आरोपीने मुलावर लैंगिक अत्याचार केला. (Pune Crime)

 

दरम्यान, या घटनेची माहिती कळताच पीडित मुलाच्या पालकांनी पोलिसांमध्ये धाव घेतली आणि संबंधित ‘चाचा’ विरोधात सोमवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे (Senior Inspector of Police Shivaji Gaware) यांनी ही माहिती दिली. याप्रकरणी पॉक्सो ॲक्ट (POCSO Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Pune Crime | 12 year old boy sexually abused by man Bhosari MIDC Police Station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा