Advt.

Pune Crime | पुण्यात 12 वर्षाच्या मुलीने दाखविली ‘बहादुरी’ ! बलात्कार करणार्‍याचा प्रयत्न करणार्‍याला घडविली ‘अद्दल’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मैत्रिणीचे प्रेमप्रकरण (Love Affair) घरी सांगितल्याने 16 वर्षाच्या मुलाने हात कापून घेतला असल्याचे सांगून एका 12 वर्षाच्या मुलीला जबरदस्तीने आपल्या रुमवर बोलावून घेऊन तिच्यावर बलात्कार (Rape in Pune) करण्याचा प्रयत्न करणार्‍या 28 वर्षाच्या नराधमाला या मुलीने बहादुरी दाखवत चांगलाच धडा शिकवला. त्याला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारुन अंगावरुन खाली पाडले व स्वत:ची सुटका करुन घेतली. या घटनेची माहिती मिळाल्यावर हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) तातडीने या नराधमाचा शोध घेऊन त्याला (Pune Crime) अटक केली.

प्रशांत ऊर्फ गोट्या प्रकाश थिट्टे (वय 28, रा. काळे पडळ, हडपसर) असे या नराधमाचे नाव आहे. त्याच्याबरोबर सहभागी 16 वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतले आहे.

ही घटना हडपसरमधील काळेपडळ (Kalepadal, Hadapsar) येथे 28 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली होती. याप्रकरणी 12 वर्षाच्या मुलीने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळे पडळ येथील 12 वर्षाच्या मुलीला एका 16 वर्षाच्या मुलाने तुला मारुन टाकीन, तुला कोयत्याने कापून टाकीन, अशी धमकी दिली. या मुलीला त्याचे मेसेज तिच्या मैत्रिणीला देण्यास सांगत असे. 28 डिसेबर रोजी प्रशांत थिट्टे याने या मुलीला गाठले. तू या मुलाचे व तुझ्या मैत्रिणीबाबत घरी का सांगितले, त्यामुळे किती प्रॉब्लेम झाला आहे. या मुलाने हात कापला असून तो रडत आहे. त्याचे खरे खोटे करण्यासाठी रुमवर ये असे सांगितले. त्याला तिने नकार दिल्यावर त्याने तिला मारहाण (Pune Crime) करुन जबरदस्तीने आपल्या रुमवर नेले. रुममध्ये गेल्यावर दाराला कडी लावून तिला बेडरुममध्ये नेले. तिला बेडवर ढकलून तिच्यावर तो जबरदस्ती करुन लागला.
तेव्हा या 12 वर्षाच्या मुलीने त्याला प्रतिकार केला. सर्व शक्ती एकवटून त्याला हाताने व लाथांनी मारले.

त्यामुळे प्रशांत बेडवरुन खाली पडला. तेव्हा या मुलीने कडी काढून घेऊन तेथून बाहेर पळ काढला.
आपल्या घरी जाऊन आईला ही हकीकत सांगितली.
तिला घेऊन तिची आई या आरोपीच्या घराकडे येत असतानाच तो पळून गेला.
त्यांनी तातडीने हडपसर पोलिसांकडे धाव घेतली.
या घटनेची माहिती मिळताच हडपसर (Hadapsar News) पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
तो कात्रज परिसरात (Katraj News) असून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी प्रशांत थिट्टे व 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला कात्रज येथून ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड (API Gaikwad) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | 12 year old girl shows bravery in Pune ! Hadapsar Police Arrest 28 years old youth who try to rape on 12 years old girl

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

Maharashtra Police |  पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ

PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

 

Anti Corruption Bureau Pune | पुण्यात वॉरंट रद्द करण्यासाठी 2 हजाराची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात