Pune Crime | दुर्दैवी ! मद्यधुंद टिपर चालकाने शाळकरी मुलीला चिरडले, लहान भाऊ आणि काका जखमी; संतप्त जमावाने पेटवला ट्रक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शाळेत सोडण्यासाठी जात असताना मद्यधुंद (Drunken) टिपर (Tipper) चालकाने दुचाकीला धडक दिली. यामध्ये 13 वर्षाच्या शाळकरी मुलीचा (Schoolgirl) टिपरच्या चाकाखाली (Crushed) येऊन दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. तर तिचा लहान भाऊ आणि चुलते गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 29) सकाळी 11 च्या सुमारास घडली. ही घटना काटी – वडापुरी रोडवर (Kati – Vadapuri Road) घडली. घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून (Fire) दिला. नागरिकांनी मद्यधुंद चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती (Pune Crime) नियंत्रणात आणली.

 

तृप्ती नाना कदम Tripti Nana Kadam (वय – 13) असे मृत्यू झालेल्या शाळकरी मुलीचे नाव आहे. तर गणेश नाना कदम Ganesh Nana Kadam (वय – 10) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर इंदापूर येथील कदम बाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच चुलते किरकोळ जखमी झाले आहेत. (Pune Crime)

मिळालेल्या माहितीनुसार, तृप्ती आणि गणेश हे काटेश्वर विद्यालय काटी येथे शिक्षण घेत होते.
तृप्ती सातवी मध्ये तर गणेश पाचवीमध्ये शिक्षण घेत होते.
सकाळी 11 च्या सुमारास त्यांचे चुलते दोघांना दुचाकीवरुन शाळेत सोडण्यासाठी जात होते.
काटी-वडापुरी रोडवर खडीचा ओव्हरलोड टिपर (एमएच 42 टी 1653) हा घेऊन मद्यधुंद चालकाने पाठीमागून दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये तृप्ती आणि गणेश रस्त्यावर पडले.

 

चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने धडक दिल्यानंतर गाडीला ब्रेक न मारता डंपर तसाच 60-70 फूटापर्यंत नेला.
डंपर पुढे गेल्याने तृप्ती पाठीमागच्या चाकाखाली आली. यामध्ये गंभीर जखमी होऊन तीचा जागीच मृत्यू झाला.
तर गणेशच्या डोक्याला मार लागला. तर चुलते किरकोळ जखमी झाले. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी टीपर पेटवून दिला.
पोलिसांनी घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title : – Pune Crime | 13 year old schoolgirl crushed by drunk driver the angry crowd set the truck on fire Kati Vadapuri Road

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा