Pune Crime | गॅस एजन्सीच्या मालकाला 14 लाखांचा गंडा ! पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या आरोपीला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गॅस एजन्सीमध्ये (Gas Agency) जमा झालेली रक्कम बँकेत न भरता मालकाला 14 लाखांचा गंडा घालणाऱ्या आरोपी कामगाराला (Accused Workers) दत्तवाडी पोलिसांनी (Dattawadi Police) बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. आरोपीकडून गुन्ह्यातील सर्व रक्कम जप्त (Pune Crime) केली आहे. आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र, पोलिसांनी त्याला शनिवारी (दि.26) अटक केली. हा प्रकार दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या (Dattawadi Police Station) हद्दीतील ढमढेरे गॅस एजन्सीमध्ये (Dhamdhere Gas Agency) घडला होता.

 

गजे सिंह उम्मेद सिंह राठोड Gaje Singh Umaid Singh Rathod (वय – 26 रा. बिबवेवाडी -Bibwewadi मुळ रा. करणीपुरा, ता. औसीया जि. जोधपुर – Jodhpur, राजस्थान – Rajasthan) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत गॅस एजन्सीचे मालक स्वप्नील सुहास ढमढेरे Swapnil Suhas Dhamdhere (वय – 43 रा. लॉ कॉलेज रोड, पुणे) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

आरोपी हा फिर्यादी यांच्या गॅस एजन्सीमध्ये मागील पाच ते सहा वर्षापासून गॅस मेकॅनिकचे (Gas Mechanic) काम करतो. फिर्यादी हे आरोपीला नेहमी बँकेत पैसे भरण्यासाठी (Bank Deposit) पाठवत असल्याने आरोपीला जमा होणाऱ्या रक्कमेबाबत माहिती होती. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता फिर्यादी यांनी 14 लाख 13 हजार 160 रुपये बँकेत जमा करण्यासाठी आरोपीकडे दिले होते. मात्र, आरोपीने पैसे बँकेत जमा न करता पैसे घेऊन फरार झाला.

 

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस ठाण्यातील तीन पथके तयार करुन आरोपीचा शोध सुरु करण्यात आला. आरोपीचा शोध घेत असताना आरोपी राजस्थान येथे पळून गेल्याची माहिती मिळाली. मात्र, आरोपी शनिवारी (दि.26) मित्रांना भेटून पुन्हा राजस्थानला पळून जाण्याच्या तयारीत असून तो लक्ष्मीनारायण चौकातील (Laxminarayan Chowk) होल्गा हॉटेलच्या (Holga Hotel) जवळ उभा असल्याची माहिती पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे (Prakash Margaje) व राहुल ओलेकर (Rahul Olekar) यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला गुन्ह्यातील मुद्देमालासह अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे (PSI Chandrakant Kamthe) करीत आहेत.

पोलिसांची केली दिशाभूल
आरोपी हा ढमढेरे गॅस एजन्सीमध्ये पाच ते सहा वर्षापासून कामाला होता. ही गॅस एजन्सी पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस (Hindustan Petroleum Gas) विक्रेते आहे. आरोपीला गॅस एजन्सीच्या कामकाजाची तसेच रोख रक्कमेची पुर्ण माहिती होती. आर्थिक चणचण असल्याने त्याने मालकाने बँकेत जमा करण्यासाठी दिलेली रक्कम घेऊन फरार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपीने फरार होताना पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याची दुचाकी सिंहगड रोडवर (Sinhagad Road) लावून गाडीची चावी आणि मोबाईल फेकून दिला. मात्र पोलिसांनी तपास करुन आरोपीला अटक केली.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड (DCP Purnima Gaikwad),
सिंहगड रोड विभागाचे (Sinhagad Road Division) सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार (ACP Sunil Pawar),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर (Senior Police Inspector Krishna Indalkar),
पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे (Police Inspector Vijay Khomane)
यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार (PSI Swapnil Lohar),
चंद्रकांत कामठे पोलीस हवालदार कुंदन शिंदे, राजु जाधव, प्रकाश मरगजे, राहुल ओलेकर, विष्णु सुतार, शिवाजी क्षीरसागर,
अक्षयकुमार वाबळे, नवनाथ भोसले, भरत अस्मार, प्रमोद भोसले, दयानंद तेलंगेपाटील यांनी केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | 14 lakh Cheating Case gas agency owner Accused of misleading police arrested by Dattawadi police

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा