Pune Crime | ‘पिंपरी-चिंचवड’च्या ‘दरोडा विरोधी’कडून 14 पिस्टल आणि 8 काडतुसे जप्त, 4 जणांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) विक्रीसाठी आणलेले 14 पिस्टल (Pistol) आणि 8 जिवंत काडतुसे (Cartridges) पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या (Pimpri Chinchwad Police Crime Branch) दरोडा विरोधी पथकाने (Anti-Robbery Squad) जप्त केली आहेत. यामध्ये 4 जणांना अटक (Arrest) करण्यात आली असून 4 लाख 90 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीपैंकी एकाकडून यापूर्वी 24 पिस्टल आणि 16 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त (Pune Crime) केली होती.
आकाश अनिल मिसाळ Akash Anil Misal (वय-21 रा. इंद्रायणीनगर, भोसरी), रुपेश सुरेश पाटील Rupesh Suresh Patil (वय-30 रा. वडगाव बुद्रुक, ता. चोपडा, जि. जळगाव), ऋतिक दिलीप तापकीर Hrithik Dilip Tapkir (वय-26 रा. पांडुरंग हाईट्स, सुतारवाडी, पाषाण), अजित उर्फ विकी रामलाल गुप्ता Ajit alias Vicky Ramlal Gupta (वय-28 रा.भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Crime)
दरोडा विरोधी पथकाला 3 जानेवारी रोजी वडमुखवाडी येथे काहीजण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दुचाकी, तीन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे,तीन मोबाईल, मिरची पूड, नायलॉन दोरी असा ऐवज पोलिसांनी जप्त केला. आरोपी एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस चौकशीत समोर आली.
आरोपींची 14 दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) घेऊन सखोल चौकशी केली. दरम्यान, पोलिसांनी आरोपींच्या घराची झडती घेतली त्यावेळी रुपेश पाटील आणि ऋतिक तापकीर यांच्या घरातून 6 गावठी पिस्टल आणि जिवतं काडतुसे तसेच आकाश मिसाळ याच्या इंद्रयणी नगर येथील घरातून 4 गावटी पिस्टल व जिवंत काडतुसे असे एकूण 10 गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसे असा मोठा शस्त्रसाठा जप्त केला.
चौकशी दरम्यान आरोपी रुपेश पाटील याने भोसरी येथील अजित गुप्ता याला पिस्टल विकल्याचे सांगितले. पोलिसांनी गुप्ता याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 2 पिस्टल आणि 1 जिवंत काडतुस जप्त केले. पोलिसांनी एकूण 14 पिस्टल आणि 8 जिवंत काडतुसे असा एकूण 4 लाख 90 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी रुपेश आणि अक्षय हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. रुपेश आणि त्याच्या साथीदारावर पोलिसांनी यापूर्वी कारवाई करुन 24 पिस्टल आणि 16 जिवंत काडतुसे जप्त केली होती. मात्र, त्याच्यामध्ये काहीच सुधारणा झाली नाही. त्याने मध्य प्रदाशून पिस्टल आणून त्याची पिंपरी चिंचवड शहरात विक्री करण्याचा काळा बाजार सुरु केला होता.
रुपेश पाटील हा भोसरी (Bhosari Police Station) आणि भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील (Bhosari MIDC Police Station) दोन गुन्ह्यात फरार होता.
त्याच्यावर देहूरोड (Dehu Road Police Station), चिंचवड (Chinchwad Police Station) आणि भोसरी पोलीस ठाण्यात 5 गुन्हे दाखल आहेत.
तर आरोपी आकाश मिसाळ याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात एक गुन्हा (FIR) दाखल आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash),
अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे (Addl CP Dr. Sanjay Shinde),
पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. काकासाहेब डोळे (DCP Dr. Kakasaheb Dole),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 पद्माकर घनवट (ACP Padmakar Ghanvat)
यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे (Senior Police Inspector Uttam Tangde),
पोलीस उप निरीक्षक महेश भांगे (PSI Mahesh Bhange), पोलीस अंमलदार महेश खांडे, उमेश पुलगम, नितीन लोखंडे,
आशिष बनकर, सागर शेडगे, गणेश कोकणे, राजेश कौशल्ये, राहुल खारगे, विक्रांत गायकवाड, राजेंद्र शिंदे,
औदुंबर रोंगे, गोविंद सुपे, नागेश माळी, शेटे यांच्या पथकाने केली.
Web Title :- Pune Crime | 14 pistols and 8 cartridges seized from Pimpri-Chinchwad Police Crime Branch, 4 arrested
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update