Pune Crime | गरिबीमुळे आईनं मोबाईल घेऊन दिला नाही, नाराज मुलाने उचललं टोकाचं पाऊल; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मुलं आपल्या आई-वडिलांकडे एखाद्या वस्तूसाठी हट्ट करत असतात. मात्र त्यांचा हट्ट पूर्ण झाला नाही तर ते टोकाचं पाऊल उचलतात. अशा अनेक घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना आता बारामतीत घडली आहे. या घटनेत आईने मोबाईल (Mobile) घेऊन दिला नाही म्हणून नाराज झालेल्या एका शाळकरी मुलाने (Schoolboy) गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केली (Committed Suicide) आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील कऱ्हा वागज गावात (Pune Crime) घडली आहे.

शुभम मोतीराम धोत्रे Shubham Motiram Dhotre (वय-14) असं आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. तो अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयात (Someshwar Vidyalaya) इयत्ता नववीत शिकत होता. मिळालेल्या माहितीनुसार, शुभमच्या वडिलांचे आधीच निधन झाले आहे. त्याची आई मोलमजुरी करुन शुभमला सांभाळत होती.
मागील काही दिवसांपासून शुभम आईकडे मोबाईल घेऊन देण्यासाठी हट्ट करत होता.
मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे आई मोबाईल घेऊ शकत नव्हती. (Pune Crime)

आई मोबाईल घेऊन देत नसल्याने नाराज झालेल्या शुभमने गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलीस ठाण्याचे (Malegaon Police Station)
पोलीस निरीक्षक अरुण अवचर (Police Inspector Arun Avachar) यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
पुढील तपास माळेगाव पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | 14 year old boy committed suicide because his mother did not bring him a new mobile phone incident in baramati news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jasprit Bumrah | “जसप्रीत बुमराह फेरारी आहे, रोज चालणारी टोयोटा कार नाही”, PAK च्या माजी कर्णधाराने बुमराहवर टीका करणाऱ्यांना सुनावले

Mohammad Rizwan | मोहम्मद रिझवानने रचला विक्रम, अशी कामगिरी करणारा पाकिस्तानचा पहिलाच क्रिकेटपटू

Traffic Jam In Pune Due To Heavy Rain | शुक्रवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरभर वाहतुकीचा खेळ खंडोबा; 60 ठिकाणी झाडपडी