Pune Crime | रस्त्याच्या कडेवरील झाडाला धडकून 14 वर्षाच्या वाहनचालकाचा मृत्यू, मुंढवा परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भरधाव जाताना वळणावर वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याकडेला असलेल्या लिंबाच्या झाडाला दुचाकी धडकली (Pune Accident News). त्यात १४ वर्षाच्या वाहनचालक मुलाचा मृत्यु झाला आहे. त्याचा सहप्रवासी किरकोळ जखमी झाला आहे. (Pune Crime)

 

निखील नितीन पेटकर Nikhil Nitin Petkar (वय १४, रा. गुरुकृपा सोसायटी, केशवनगर, मुंढवा) असे मृत्यु पावलेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील पेटकर हा अल्पवयीन मुलगा दुचाकीवरुन त्याचा मित्र सुमित सुजित बरनवाल Sumit Sujeet Barnval (वय १६, रा. गुरुकृपा सोसायटी, केशवनगर, मुंढवा) याला घेऊन गुरुवारी दुपारी केशवनगरमध्ये (Keshav Nagar, Mundhwa) जात होता.

 

दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कल्याणी बंगला रोडवर वळणावर त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी डाव्या बाजूला असलेल्या लिंबाच्या झाडाला जाऊन जोरात धडकली. त्यात निखील याच्या डोक्याला व तोंडाला जबर दुखापत झाली. त्यात त्याचा मृत्यु झाला. त्याच्याबरोबर असलेला सुमित बरनवाल हा किरकोळ जखमी झाला आहे.

 

Web Title :- Pune Crime | 14 years old boy died in accident mundhwa area

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा