Pune Crime | पुणे स्टेशन परिसरातून 15 लाख 67 हजारांचे अमली पदार्थ जप्त; दोघांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे स्टेशन परिसरातून साडे पंधरा लाखांचे अमली पदार्थ पोलिसांकडून (Pune Crime) जप्त करण्यात आले. यामध्ये मेफेड्रोन (एमडी) विक्रीसाठी आलेल्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Pune Police Crime Branch) अटक (Arrested) केले आहे.

 

याप्रकरणी सलीम मुबारक शेख (Salim Mubarak Sheikh) (वय, 37, रा. सहारा अपार्टमेंट, नवाजीश पार्क चौक, कोंढवा) आणि विजय विनोद डेडवालकर (Vijay Vinod Dedwalkar) (वय, 33, रा. बरके आळी, सोमवार पेठ) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

याबाबत माहिती अशी की, पुणे स्टेशन परिसरातील तुकाराम शिंदे वाहनतळाजवळ (Tukaram Shinde parking lot) दोघेजण दुचाकीवरून आले असून त्यांच्याकडे अमली पदार्थ असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. या माहितीनूसार पथकाने सापळा लावला. यानंतर सलीम शेख आणि विजय डेडवालकर या दोघांना पुणे स्टेशन परिसरातून अटक (Arrested) करण्यात आले. त्यांच्याकडून 15 लाख 67 हजारांचे मेफेड्रोन, रोकड, मोबाइल संच, दुचाकी, इलेक्ट्राॅनिक वजन काटा असा एकूण 17 लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (Jt CP Dr. Ravindra Shisve), अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Shriniwas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (PI Vinayak Gaikwad), सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dhengale), मनोज साळुंके (Manoj Salunke), पांडुरंग पवार (Pandurang Pawar), विशाल दळवी (Vishal Dalvi) यांनी केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | 15 lakh 67 thousand drugs seized from Pune station area; Both arrested, Pune Police Crime Branch action

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

JanDhan Account | जनधन खातेधारकांसाठी खुशखबर ! आता बॅलन्स नसताना घेऊ शकता 10 हजार रुपयांचा फायदा, जाणून घ्या

Multibagger Stock | 152 रुपयांचा स्टॉक झाला 1,524 रुपयांचा, गुंतवणुकदारांना दिला 900% रिटर्न, तुमच्याकडे आहे का?

Pune Crime | ‘कोलते पाटील डेव्हलपर्स’ची 44 लाख रुपयांची फसवणूक; पुणे पोलिसांकडून दोघांना अटक

Mumbai High Court | शारीरीक संबंधानंतर विवाहाला नकार देणे फसवणूक नाही; मुंबई उच्च न्यायालयाने तरूणाची केली सुटका

Maharashtra GST Department | 233 कोटींची खोटी बिले देणाऱ्या व्यापाऱ्यास अटक; GST विभागाची पुण्यात मोठी कारवाई